जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत ह.भ.प.भगवान बाबा यांचे गुरू श्री संत नाना बाबा गीते यांच्या समाधी मंदिराच्या पायाभरणी शुंभारंभ नुकताच खर्डा येथील गीते बाबा गडावर ह.भ.प.त्रिविक्रम शास्त्री महामंडलेश्वर 1008 (इंदूवासींनी संस्थान) यांच्या शुभहस्ते व इतर पंडितांच्या उपस्थितीत व माजी सरपंच संजय गोपाळघरे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करून संपन्न झाला आहे.खर्डा शहराच्या कानिफनाथ टेकडी जवळ हे संत गीते बाबांचे पुरातन मंदिर आहे.या मंदिराचा समावेश क वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश झाला आहे पण सध्या हा उपक्रम लोकवर्गणीतून होत आहे.

मंदिराच्या परिसरात आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून या परिसरातील भव्य असे वॉल कंपाउंड तयार करण्यात आले आहे, सध्या समाजातील दानशूर लोकांच्या मदतीने मंदिर बांधण्याच्या काम सुरू करण्यात आले आहे या ठिकाणी पाण्याची टाकीचे बांधकाम सुरू आहे याकामा करीत सर्वच लोकांनी लोकवर्गणी देऊन आपले योगदान दयावे असे आवाहन श्री संत भगवान बाबा ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.या प्रसंगी सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, पंचायत समितीचे उपसभापती रवी सुरवसे, माजी पंचायत समितीचे सदस्य विजयसिंह गोलेकर, डॉ. अंकुश गोपाळघरे, डॉ. राजेंद्र नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सोपान, गोपाळघरे, डॉ. बिपिन लाड, मिलन कांकरीया, तुलसीदास गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, मदन पाटील, वैजिनाथ पाटील, दिघोळ येथील मा,सरपंच गहिनीनाथ गीते, बापू महाराज गीते, हरिआबा गीते, कृष्णा गीते, करणं जायभाय, रामहरी गोपाळघरे, केशव गोपाळघरे, जगन्नाथ जायभाय, बाळासाहेब गीते, दत्तराज पवार इत्यादी सह खर्डा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.