जामखेड न्युज——
ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार
मुंजेवाडीचे मुख्याध्यापक दशरथ हजारे ३६ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुंजेवाडीचे मुख्याध्यापक व जवळा गावचे सुपुत्र दशरथ हजारे यांच्या ३६ वर्षाच्या सेवापूर्ती निमित्ताने मुंजेवाडी ग्रामस्थांनी सेवापूर्ती सोहळा अयोजीत केला होता. या कार्यक्रमास कर्जत- आ. प्रा. राम शिंदे, पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे सह मान्यवरांच्या हस्ते मुंजेवाडी येथे नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार राम शिंदे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, ज्योती क्रांती मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ हजारे यांनी मनोगत व्यक्त करताना दशरथ हजारे यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान व समाज कार्यात दिलेले योगदान. या योगदानाचे कौतुक मान्यवरांनी यावेळी केले. य शालेय विद्यार्थ्यांनी, आलेल्या मान्यवरांनी व नातेवाईकांनी सत्कार केला.
जि .प. शिक्षक दशरथ हजारे यांनी बीड जिल्ह्यामध्ये १८वर्षे ,जामखेड तालुक्यातील गोयकरवाडी येथे १२ वर्षे व मुंजेवाडी येथे ६ सहा वर्षे अध्यापनाचे काम केले. यावेळी त्यांनी आलेल्या मान्यवरांना शालेय विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना गावकऱ्यांना गोड जेवण दिले. या सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व प्रमुख उपस्थिती आमदार राम शिंदे, शिक्षणाधिकारी बीड नागनाथ शिंदे, गटशिक्षणाधिकारी जामखेड कैलास खैरे ,जि.प .सदस्य सोमनाथ पाचरणे ,जवळा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शहाजी पाटील , शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्ष मुंजेवाडी जालिंदर महानवर, पंचायत समिती माजी सभापती सुभाष आव्हाड, उपसरपंच मुंजेवाडी बाजीराव खाडे, भाजप शहराध्यक्ष पै. शरद कार्ले, पैलवान बाबासाहेब महारनवर , जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ अहमदनगर बापूराव तांबे , विस्तार अधिकारी सुरेश कुंभार, केंद्रप्रमुख हाळगाव राजेंद्र त्रिंबके, राष्ट्रवादीचे युवा नेते सुभाष शिंदे, युवा नेते बबन ठकान, लक्ष्मण खाकाळ सर अल्ताफ शेख उदयसिंह पवार मोहन गडदे महेंद्र मोहोळकर सुनील हजारे सत्तार शेख चंद्रकांत डोके जुन्नर बाबासाहेब खराडे बंडू सातव भारत कुबेर अनिरुद्ध शिंदे सरपंच भातोडी मधुकर गीते लक्ष्मण हिंगणे, विकास हजारे, सुभाष फसले, अमोल पवार, मतेवाडी सरपंच आप्पासाहेब मते, मतेवाडी माजी सरपंच कानिफ मते, व्यापारी अनिल सरोदे, बापूराव ढवळे, ज्ञानेश्वर झेंडे, मारुती रोडे, विष्णू हजारे, पांडुरंग उबाळे या मान्यवरांसह मुंजेवाडी पंचक्रोशीतील व जवळा पंचक्रोशीतील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास हजारे यांनी केले.