ज्येष्ठ साहित्यिक डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांना जामखेड येथे श्रद्धांजली

0
184

जामखेड न्युज——

 

जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठान चे वतीने  
ज्येष्ठ साहित्यिक व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना सर्व सभासदांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रसिद्ध लेखक  प्रा.आ. य. पवार यांनी प्रस्ताविकात डॉ कोत्तापल्ले सरांचे वाड्मयीन कार्याची माहिती दिली व म्हणाले की,  कोत्तापल्ले सरांनी ग्रामीण साहित्य चळवळीला मोठे बळ दिले.
दोन वर्षांपूर्वी मराठी साहित्य प्रतिष्ठानने जानेवारी २०२० मध्ये खर्डा येथे दोन दिवसांचे महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन घेतले , त्यास अध्यक्ष म्हणून ते आवर्जून आले व विविध जिल्ह्यांतून संमेलनास आलेल्या नामवंतासह
नवोदितांना त्यांनी उत्तम मार्गदर्शन केले.त्यांच्याच प्रेरणेने
२०२१ मध्ये पुणे जिल्ह्यात दुसरे महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन घ्यावयाचे होते,पण कोरोना लाटेमुळे आयोजन करता आले नाही.डॉ. कोत्तापल्ले सरांनी आपल्या संस्थेला आपुलकी व जिव्हाळा दिला.त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली असून आपल्या संस्थेचा मोठा आधार हरपला आहे.
प्रा.मधुकर राळेभात  म्हणाले की, मराठवाडा विद्यापीठाचे‌२००५ ते २०१० या कालावधीत कुलगुरू असतांना अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली. दर्जेदार लेखनाप्रमाणे त्यांना वाचनाचा मोठा छंद  होता. त्यांनी लिहिलेली विपूल ग्रंथ संपदा असून, तरूणांनी त्यांचे साहित्य आवर्जून वाचावे.कोत्तापल्ले सरांच्या स्मृति जपण्यासाठी तरूणाईने वाचनाचा छंद जोपासावा हीच त्यांना श्रद्धांजली  ठरेल. 
डॉ.जतीन काजळे म्हणाले की, खर्डा येथील महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलनास अध्यक्ष म्हणून डॉ कोत्तापल्ले सर आल्यामुळे दोन दिवस त्यांचा सहवास नवोदितांना लाभला  हे जामखेड व आष्टी परिसरातील साहित्यरसिकांचे भाग्य होय. त्यांच्या निधनामुळे आम्हा सर्व साहित्य रसिकांना मोठे दुःख झाले आहे. याप्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ.शत्रुघ्न‌ कदम , सदस्य प्रा.प्रकाश तांबे प्रा.महादेव मोरे यांनीही विचार मांडले.विश्व दर्शनचे संचालक गुलाबराव जांभळे व‌ कवि रंगनाथ राळेभात यांनी पसायदान गायिले. कवि कुंडल राळेभात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा.मोहन डुचे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here