जामखेड न्युज——
आष्टीच्या बाळेवाडीमध्ये 70 किलो गांजा जप्त
बाजारभावानुसार सात लाख रुपये किंमत
बीड-आष्टी-नगर राष्ट्रीय महामार्गापासून आठ किलोमीटर अंतरावर कपाशीमध्ये लावलेल्या शेतात १०० गांजाची झाडांची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून ७० किलो गांजा पकडल्याची घटना बाळेवाडी येथे घडली.
आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथील हनुमंत अर्जुन पठारे याने स्वताच्या शेतात कपाशी लावली होती.त्या पिकात गांजाची झाडे लावल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना समजताच त्यानी कारवाई करत कपाशी शेतात गांजाच्या १०० झाडे लावल्याचे निदर्शनास आले. त्याचे एकूण ७० किलो वजन होते. अंभोरा पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे याच्या तक्रारीवरून आरोपी हनुमंत अर्जुन पठारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार आहे. ही कारवाई एसपी नंदकुमार ठाकूर, एएसपी सचिन पांडकर, एलसीबी पीआय सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, एएसआय वचिष्ठ कांगणे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाबूराव तांदळे, शिवदास केदार, सोमनाथ गायकवाड, अशोक कदम यांनी केली. आरोपी पसार झाला आहे.
यापूर्वीही हनुमंत पठारेवर अशाच प्रकारचे गुन्हे आरोपी शेतमालक हनुमंत पठारे याच्यावर यापूर्वीही गांजाची झाडे लावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तो बीडसह इतर जिल्ह्यात गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, एलसीबीकडून कारवाई होत असताना स्थानिक पोलिसांना माहिती मिळत नाही का असा प्रश्न आहे.