जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी साकत गाव सहा दिवस अत्यावश्यक सेवा वगळता पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. किराणा दुकानदार व पिठाची गिरणी चालकांना कोरोनाचे सर्व नियम पाळत सकाळी व सायंकाळी काही काळ दुकान उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे दुकान पंधरा दिवस सील करण्यात येईल याचबरोबर विनामास्क फिरणाऱ्यांवर दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल हे सर्व कठोर नियम कोरोना साखळी तोडण्यासाठी आज झालेल्या बैठकीत ठरले. तसेच गावातील सामान्य रूग्णासाठी तसेच रिपोर्ट येईपर्यंत जे औषधे लागतील ती सर्व औषधे डॉ. भगवानराव मुरुमकर व हनुमंत पाटील हे उपलब्ध करून देतील असे त्यांनी जाहीर केले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर, माजी सरपंच हनुमंत पाटील, हरीभाऊ मुरुमकर,
पोलीस पाटील महादेव वराट, ग्रामपंचायत सदस्य सागर मुरूमकर, मिलन घोडेस्वार, महादेव वराट, विठ्ठल वराट, नागेश वराट, डाॅ. अजय वराट, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाखरे, डॉ. मुबारक शेख, तलाठी सचिन खेत्रे, बाळासाहेब वराट, रामहारी वराट, नागराज मुरुमकर, सतिश लहाने, प्रभु पुलवळे, अतुल दळवी यांच्या सह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी संपुर्ण गावांसाठी डॉ. भगवानराव मुरुमकर व हनुमंत पाटील यांच्या वतीने व्हिटॅमिन सी व इतर औषधे उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले यावेळी गावात एखाद्या घरात कोणी आजारी असेल तर त्या घरातील संपुर्ण कुटुंबाची तपासणी केली जाईल यासाठी सोमवार ते शनिवार पर्यंत रोज साकत मध्ये अॅटिजेन तपासणी कॅम्प ठेवण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी जर कोणाला सर्दी खोकला त्रास असेल तर ताबडतोब तपासणी करून घ्यावी याचबरोबर ज्या व्यक्तीची आरटीपीसीआर तपासणी केली असेल त्या व्यक्तीचा रिपोर्ट येईपर्यंत त्या व्यक्तीला शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल तसेच गावात जर कोणी विनामास्क फिरताना दिसला तर त्याला दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानदारांनी जर नियमांचे पालन केले नाही तर त्या दुकानदाराला पाच हजार रुपये दंड व पंधरा दिवस दुकान सील करण्यात येईल. तसेच सोमवार ते शनिवार रोज अॅटिजेन तपासणी कॅम्प ठेवण्यात येईल अशा प्रकारे निर्णय बैठकीत एकमुखाने मंजूर करण्यात आले.