कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करणार्‍या आरोळे कोविड सेंटरची केंद्रीय पथकाकडून प्रशंसा

0
229
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – ( सुदाम वराट ) 
    कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटर हे परिसरासाठी वरदान आहे. आरोळे कोविड सेंटर
 म्हणजेच जुलिया हॉस्पिटलला नुकतीच केंद्रीय पथकाने पहाणी करत समाधान व्यक्त केले तसेच हाॅस्पिटलचे संचालक डॉ. रवी आरोळे व डॉ. शोभा अरोळे
यांच्या बरोबर चर्चा करत हाॅस्पिटल मधील उपचार पद्धती जाणुन घेतली डॉ. रवी आरोळे यांनी आरोग्यमंत्री यांना पत्र पाठवून संपूर्ण राज्यात स्वत उपचार पद्धती राबविण्यात यावी अशी मागणी केली आहे.
        राज्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. नगर जिल्ह्यात देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र नगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात डॉ. रवी आरोळे व शोभा आरोळे यांच्या जुलिया हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर करण्यात येणारी अनोखी उपचार प्रणाली.
          नगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील जुलिया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रवी आरोळे व डॉ. शोभा अरोळे हे कोरोना रुग्णांवर उपचार करतात. विशेष म्हणजे या हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत 4000 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे या हॉस्पिटलमध्ये रूग्णांवर अनोखी उपचार प्रणालीचा उपयोग केला जातो. एकीकडे राज्यात रेमडेसिवीर औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचा तुटवडा देखील भासत आहे. मात्र या हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर औषध रुग्णांना दिले जात नाही. ICMR मान्यताप्राप्त औषध आणि ऑक्सिजन कोरोना बाधित रुग्णांना दिले जाते. त्यामुळे कोरोना रुग्ण लवकरात लवकर बरे होतात. त्यामुळे परिसरासाठी हे सेंटर वरदान ठरले आहे. या उपचार पद्धतीचा वापर करून चार हजार रूग्ण बरे झाले आहेत तर सुमारे पाचशे रूग्ण उपचार घेत आहेत.
विशेष म्हणजे या हॉस्पिटलमध्ये दिले जाणारे औषधे अत्यंत स्वस्त आहेत. त्यामुळे कोणतेही महागडे उपचार घेण्याची गरज रुग्णांना पडत नाही. तसेच कोरोनाचे रुग्ण तर बरे होतातच पण खर्च देखील कमी होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशात रुग्णांना रेमडेसिवीर औषध दिल्याने रुग्ण बरे होतात. त्यामुळे या औषधांची मागणी देखील वाढत आहे. मात्र ICMR मान्यताप्राप्त औषध दिले तरी देखील रुग्ण बरे होतात, असा दावा डॉ. आरोळे यांनी केला आहे. इतकेच नाही तर ही उपचार पद्धती राज्यात वापरली तर कमी खर्चात जास्तीत जास्त रुग्ण बरे होतील, असं देखील त्यांनी सांगितले आहे.
डॉ. रवी आरोळे यांनी वापरलेल्या उपचार प्रणालीचे केंद्राच्या पथकाने देखील कौतुक केले आहे. तसेच अशी उपचार प्रणाली सर्वत्र वापरावी, असं पत्रही आरोळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे. खऱ्या अर्थाने अत्यंत स्वस्त असलेली ही उपचार प्रणाली वापरली तर कोरोनवर निर्बंध घालण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here