शालेय जीवनातील विविध स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया……केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते (केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा तेलंगशी केंद्र शाळेत संपन्न…)

0
185

जामखेड न्युज——

शालेय जीवनातील विविध स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया……केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते

(केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा तेलंगशी केंद्र शाळेत संपन्न…)

शालेय जीवनातील विविध स्पर्धात्मक उपक्रमातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत भाग घेऊन कला गुणांना वाव द्यावा.असे प्रतिपादन तेलंगशी केंद्राचे केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते यांनी केले. तेलंगशी शाळेत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील केंद्र स्तरावरील आयोजित विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद् घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी विविध स्पर्धा पाहून त्यांनी केंद्रातील सर्वच विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन स्पर्धेस सुरुवात झाली. विविध वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांचा स्पर्धेतील उत्साह यावेळी दिसून येत होता. तेलंगशी केंद्रातील सर्वच शाळांचा स्पर्धा सहभाग उल्लेखनीय होता.यावेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ असे विविध कलागुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.केंद्रातील सर्वच शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम असे कलागुण सादर करण्यासाठी प्रेरित केले होते.

यावेळी हस्ताक्षर,वक्तृत्व,वैयक्तिक गीत गायन,गोष्टकथा सादरीकरण,वेशभूषा सादरीकरण,समूहगीत गायन व सांस्कृतिक स्पर्धां घेण्यात आल्या.गटविकासअधिकारी श्री.प्रकाश पोळ साहेब,गटशिक्षणाधिकारी श्री.कैलास खैरे साहेब,विस्तार अधिकारी श्री.कुंभार साहेब व केंद्रप्रमुख श्री. मुकुंदराज सातपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाने या स्पर्धा पार पडल्या.स्पर्धा प्रमुख म्हणून मुख्याध्यापक श्री.केशव गायकवाड सर व श्री.रुपेश वाणी सर यांनी काम पाहीले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री. आनंदा राऊत सर,नारायण लहाने सर,चंद्रकांत पांडुळे सर,आनंता गायकवाड सर,संभाजी जाधव सर,अंबादास गाडे सर,कविता गुजर मॅडम, आशा सोळसे मॅडम, प्रसाद भिसे सर,निलेश कांबळे सर,जीवन जंबे सर,नागनाथ बुडगे सर,दिपक तांबे सर,चांगदेव पारधी सर,नितेश महारनवर सर,संदिप गायकवाड सर,विजयकुमार रेणुके सर,नितीन पवार सर,अशोक जाधव सर व सुशेन चेंटमपल्ले सर या केंद्रातील शिक्षकांनी स्पर्धा आयोजनात विशेष परीश्रम घेतले.

जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी येथे या स्पर्धांचे उत्कृष्ठ असे नियोजन करण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here