जामखेड न्युज——
दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून तलवारीने हल्ला, जामखेड पोलिसात पाचजणांविरोधात आर्म अँक्ट नुसार गुन्हा
दारु पिण्यासाठी पैसै दिले न दिल्याने एकावर तलवार व लोखंडी पाईपने मारहाण करत हल्ला केला. या घटनेत फीर्यादी गंभीर जखमी झाल्याने त्यास नगर येथील खासगी हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एकुण पाच जणांविरुद्ध आर्म ॲक्ट सह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की फीर्यादी अंगद कीसन सांगळे वय ४६ वर्षे, रा. सारोळा. ता. जामखेड हे दि ७ डीसेंबर रोजी आपल्या स्कुटी क्रमांक एम एच १६ सी. एल ५९२२ या दुचाकीवरून खर्डा ते जामखेड रोडने गावाकडे येत होते. यावेळी यातील आरोपी दिनेश खरात (पुर्ण नाव माहीत नाही) रा. बटेवाडी, ता जामखेड व त्याच्या सोबत आसलेले इतर चार अनोळखी अशा एकूण पाच जणांनी फिर्यादीची गाडी आडवुन थांबविले व फिर्यादी अंगद सांगळे यांना दारु पिण्यासाठी पैसै मागितले फिर्यादी यांनी पैसै देण्यास नकार दिला याचाच आरोपींना राग आला व आरोपी क्रमांक एक दिनेश खरात याने शिवीगाळ करत फिर्यादीवर तलवारीने हल्ला केला व त्याच्या सोबत आसलेल्या इतर चार जणांनी हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीस मारहाण करून गंभीर जखमी केले. या नंतर फिर्यादीच्या खिशातील दहा हजार रुपये रोख रक्कम व गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन काढुन घेतली. व इतर जणांनी त्याच्या खिशातील मोबाईल फोन काढुन घेत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या नंतर जखमी झालेले फिर्यादी अंगद सांगळे यांना तातडीने पुढील उपचारासाठी नगर येथील खजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आज दि ८ रोजी जखमी अंगद सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकुण पाच आरोपीं विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आर्म ॲक्ट सह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.