जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरला सामाजिक भान जपत मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनचे संस्थापक उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांच्या वतीने अकरा हजार रुपये धनादेश देऊन मदत करण्यात आली.
यावेळी डॉ. शोभाताई आरोळे जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, आरिफ भाई शेख, मयूर भोसले, विश्वदर्शन संचालक गुलाब जांभळे, पत्रकार अशोक निमोकर, पप्पुभाई सय्यद, अनिल म्हेत्रे , सुलताना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने निस्वार्थ सेवेबद्दल डॉक्टर रावी आरोळे व शोभाताई आरोळे यांचा सत्कार करून सन्मानचिन्ह देण्यात आले.
मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन या मार्फत विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात तसेच क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या हिताचे कार्य केले जाते व गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन व मदत करते.