आमदार रोहित पवार जनतेला वेड्यात काढण्याचे काम करतात – बिभीषण धनवडे जामखेड पाणीपुरवठा योजनेचे श्रेय आमदार प्रा. राम शिंदे यांचेच

0
186

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवार जनतेला वेड्यात काढण्याचे काम करतात – बिभीषण धनवडे

जामखेड पाणीपुरवठा योजनेचे श्रेय आमदार प्रा. राम शिंदे यांचेच

जामखेड पाणीपुरवठा योजना आमदार प्रा. राम शिंदे मंत्री असताना मंजुरी मिळालेली आहे पण या योजनेचे श्रेय आमदार रोहित पवारांचेच आहे असे त्यांचे बगलबच्चे म्हणतात. आमदार रोहित पवारांमुळेच पाणीपुरवठा योजना मंजुर झाली अशी टिमकी वाजवत आहेत. जनतेला वेड्यात काढण्याचे काम करत आहेत. असे भाजपा शहराध्यक्ष बिभीषण धनवडे यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे. 

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सन 2019-20 च्या सुधारित दरपत्रकानुसार 9 जुलै 2019 रोजी 115 कोटी 91 लाखाची सुधारित तांत्रिक मंजूरी मिळाली होती, याला आमदार राम शिंदे यांनी मंत्री असताना मंजुरी मिळवली होती, या योजनेच्या तांत्रिक तपासणी अंतर्गत 1 टक्का शुल्क 1 कोटी 23 लाख 19 हजार 514 रूपये शासनाला 11 जुलै 2018 रोजी नगर परिषदेमार्फत जमा करण्यात आले होते. त्यावेळी मी पाणी पुरवठा सभापती म्हणून नगरपरिषदेत कार्यरत होतो. त्यावेळी सर्व टेक्निकल बाजू बघितल्या गेल्या होत्या, पाणीपुरवठ्यासाठी कन्सल्टंट आणि आम्ही सर्व नगरसेवक ज्या ठिकाणी उजनीचं उद्भव आहे त्या ठिकाणी स्वत: गेलो होतो, पाणी पुरवठ्याच्या फिल्टर प्लँटसाठी पाडळी फाट्यावरची माझ्या बहिणीच्या नावावरील जी जागा आहे त्या जागेसंदर्भात आम्ही 100 रुपयाच्या स्टँपवर नगरपरिषदेला नोटरी करून दिली होती, त्यामुळं या योजनेचा आणि रोहित दादा पवारांचा कुठेही लांब लांब संबंध नाही, म्हणून मी आणखी एकदा सांगतो, या काही सगळ्या घडामोडी आहेत, 11 जुलै 2018 रोजी 1 कोटी 23 रूपये ही रक्कम शासनाला जमा केली होती, ही रक्कम राम शिंदे साहेब मंत्री असतानाच जमा केली होती.

रोहित पवारांकडून जनतेला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे, जामखेड पाणी योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वर्षभरापूर्वी (13 नोव्हेंबर 2021) करण्यात आले होते. मग गेल्या वर्षभरात या योजनेच्या कामाला सुरुवात का झाली नाही ? सदर योजनेला 1 डिसेंबर 2022 ला प्रशासकीय मंजुरी मिळाली, मग रोहित पवारांनी मागील वर्षी पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम कसा घेतला ? भूमिपूजना आधी सदर कामाची वर्क ऑर्डर झाली होती का ? जर वर्क ऑर्डरच नव्हती तर मग भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतलाच कसा ? संवैधानिक पदावरील मंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन करून वर्षभरात योजना सुरू करता आली नाही याचा अर्थ कर्जत-जामखेडमधील जनतेला वेड्यात काढण्याचा हा प्रकार आहे. जामखेडची पाणी योजना मंजुर नसताना या योजनेचे भूमिपूजन करण्यामागे आमदार रोहित पवारांचा उद्देश साफ नसल्याचं दिसून येत आहे.

तत्वत: मंजुरीला काहीही किंमत नाही असं राष्ट्रवादीवाले वारंवार सांगत आहेत, परंतू जामखेडला उजनीहून पाणी योजना असावी असा पहिला विचार शिंदे साहेबांच्या मनात आला, त्यादृष्टीने काम सुरू झाले याला जास्त किंमत आहे. योजनेचा पहिला प्रस्ताव शिंदे साहेबांच्याच काळात झाला आणि मंजुरीही त्यांनीच आणली, मध्यंतरीच्या काळात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मागील तीन वर्षांत रोहित पवारांना पाणी योजना का मंजुर करता आली नाही? आता पाच महिने झाले आमची सत्ता आलीय, या काळात आमचे नेते शिंदे साहेबांनी पाणी योजना मंजूर करून दाखवली, मग हीच प्रशासकीय मंजुर रोहित पवारांना तीन वर्षांत का करता आली नाही,

सगळ्या योजना आमदार राम शिंदे साहेब मंत्री असतानाच्या आहेत, यांनी फक्त मागील तीन वर्षांत कागदपत्र फिरवा फिरवीचं, प्रलंबित ठेवण्याचं काम केलयं, रोहित पवारांचा हाच हेतू चांगला नव्हता हे स्पष्ट होतयं, आमदार राम शिंदे साहेबांना श्रेय जावू नये म्हणून त्यांची धडपड सुरू होती, तीन वर्षे पाणी योजनेपासून जनतेला दुर ठेवण्याचे काम रोहित पवारांनी केलं आहे. शेवटी तुम्ही किती जरी कालवा केला, किती जरी ओरडू ओरडू सांगितलं हे आम्हीच केलं हे आम्हीच केलं, परंतू लोकांच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आहेत, तुमच्या भूलवा भूलवीला जनता आता बळी पडणार नाही, पुर्वी जे नगरसेवक आमच्याकडे होते, तेच आता त्यांच्याकडे गेले आहेत, त्यांना पाणी योजनेची सर्व वस्तुस्थिती माहित आहे, त्यामुळे ते यावर काहीही बोलत नाहीत.

एका व्यक्तीने पत्रकार परिषद घेत आमदार राम शिंदे साहेबांचा ऐकेरी भाषेत उल्लेख करत त्याची आणि त्याच्या नेत्याची जी काही संस्कृती आहे ती दाखवून दिली, स्वत: मात्र ग्रामपंचायत सदस्य नसताना आणि कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नसताना स्वता:ला नेता समजणार्‍या व्यक्तीने जनतेची दिशाभूल करण्याचे काम सोशल मिडीयावर जोरात चालू केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here