गुजरात विधानसभा निवडणूकीतील विजयानंतर जामखेडमध्ये भाजपाचा आनंदोत्सव

0
223

जामखेड न्युज——

गुजरात विधानसभा निवडणूकीतील विजयानंतर जामखेडमध्ये भाजपाचा आनंदोत्सव

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्याने भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी
जामखेड मध्ये आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत घोषणा देत भाजपचा विजय असो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, सरचिटणीस अर्जुन म्हेत्रे, प्रा. अरूण वराट, गोरख घनवट, उद्धव हुलगुंडे, पांडुरंग उबाळे, धामनगावचे हॅट्रीक सरपंच महारुद्र महारनवर, लहु शिंदे, जवळा गटप्रमुख डाॅ. गणेश जगताप, नगरसेवक गणेश आजबे,नगरसेवक संदीप गायकवाड, तुषार बोथरा,
राजु शिंगने, पप्पु काशिद,युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष, बापुसाहेब माने, मोहन मामा गडदे, आण्णासाहेब वायसे, शैलेश कदम, तान्हाजी फुंदे, मोहन देवकाते, बाळासाहेब गायकवाड, आशोक मोरे, बिट्टु मोरे, पांडुराजे मोरे, दत्ता गिरी यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

गुजरात विधानसभा निवडणूक भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगा झाली. मात्र, निकालात ही निवडणूक एकतर्फी झाल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण ताकद लावून झोकून देणाऱ्या आपला एक अंकी आमदारांसह केवळ खातं खोलता आलं आहे. काँग्रेसच्या जागांमध्येही मोठी घट झालीय आणि भाजपाला १५६ जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला आहे. यामुळे जामखेड भाजपाने आनंदोत्सव साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here