किल्ले स्पर्धा उपक्रम कौतुकास्पद- उद्योजक दिलीप गुगळे श्री शिवप्रतिष्ठान जामखेड तालुका किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न

0
218

जामखेड न्युज——

किल्ले स्पर्धा उपक्रम कौतुकास्पद- उद्योजक दिलीप गुगळे

श्री शिवप्रतिष्ठान जामखेड तालुका किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न

मोबाईल च्या महाजालातून बाहेर पडून दिपावली सुट्टीत विद्यार्थी किल्ले बनवतात यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिदुस्तान प्रोत्साहन देते हि बाब खूपच कौतुकास्पद आहे. शिवप्रतिष्ठान हे काम निरपेक्ष भावनेने करत आहे त्यामुळे निस्वार्थ भावनेने केलेले कार्य नेहमीच चांगले होते असे उद्योजक दिलीप गुगळे यांनी आपले मत व्यक्त केले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड तालुका आयोजित किल्ले स्पर्धा 2022 चे बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार झाले

कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक दिलीप गुगळे साहेब , श्रीशिवप्रतिष्ठान तालुका प्रमुख पांडुरंग भोसले,अहिल्यादेवी होळकर समितीचे सचिन काशीद ,संजय खरात ,गांधी कोचिंग क्लासेस संचालक सागर गांधी,सौ नितु सागर गांधी,कला तालुका अध्यक्ष शरद शिरसाठ, हरीष सायकल मार्टचे अक्षय साखरे,मनसेचे प्रदीप टापरे, विठ्ठल वराट, मल्लखांब प्रशिक्षक नाना खंडागळे, गणेश जोशी जगु म्हेत्रे भाउ पोटफोडे गोकुळ म्हेत्रे दिग्विजय तावरे सचिन देशमुख व सर्व स्पर्धक , पालक उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते किल्ला स्पर्धा 2022 ची बक्षिस वितरण करण्यात आले बक्षीसाचे स्वरूप शिवचरित्र ग्रंथ व रनटेकडी सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक असे होते.

तालुकास्तरावर क्रमांक प्रथम – वैभवी विठ्ठल वराट( पदमदुर्ग )
द्वितीय- सारंग शरद शिरसाठ( सिंहगड)
तृतीय- रोहन विठ्ठल मोरे( सिंहगड)
चौथा- विक्रांत रमेश वाटाडे(राजगड)
पाचवा- अंकिता रामचंद्र जाधव( सिंहगड),
सहावा- राजनंदनी कल्याण चौधरी खर्डा
सातवा- सुरेश मोरेश्वर रेळेकर( प्रतापगड)
आठवा- संभाजी नितीन भोसले (जंजीरा)
यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चरीत्रग्रंथ सन्मान चिन्ह व प्रशासकीपथक देण्यात आले व व सर्व स्पर्धकास प्रशस्तीपत्र रणटेकडी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप गुगळे यांनी श्रीशिवप्रतिष्ठानचे अनेक सामाजिक उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहेत. किल्ले स्पर्धा हा उपक्रम अनेक वर्षापासून चालू आहे या आधीही असा उपक्रम कोणीही घेतलं नाही.

अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडतात. अतिशय आत्मीयतेने व मनोभावनेने शिवप्रतिष्ठानचे कार्य आहे. किल्ला बनवताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व सुट्टीच्या काळात विद्यार्थी मोबाईल पासून दूर राहून त्यांच्यावर सकारात्मक बदल होतो. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व कलागुणांना वाव मिळतो. हे कार्य निस्वार्थ भावनेने असल्यामुळे चांगले आहे.

विद्यार्थ्यांना भविष्यात विविध क्षेत्र जाण्यासाठी या कला गुणांचा उपयोग होतो. असे मनोगत उद्योजक दिलीप गुगळे यांनी व्यक्त केले.

तालुकाप्रमुख पांडुरंग भोसले यांनी मनोगतामध्ये.श्रीशिवप्रतिष्ठान तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी 41 स्पर्धकांनी स्पर्धांमध्ये भाग घेतला आदरणीय भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिष्ठानचे कार्य करत आहोत विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास व गडकोट किल्ल्यांची माहिती मिळावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेम जागृत होण्यासाठी व शालेय जीवनात कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते किल्ले बांधत असताना शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर येतो हे प्रत्यक्षात जाणवते. गड किल्ल्यांचा इतिहास प्रेरणादायी आहे असे मार्गदर्शन केले. सर्व स्पर्धकांना ११ मार्च १७९५ निजामशाही ज्या रणटेकडी वरती पराभूत केली त्या रणटेकडी ची प्रतिमा देण्यात आली यातुन तालुक्यातील ऐतीहासीक स्थळाचा प्रसार होतो व सर्वांना आपल्या तालुक्यात मराठ्याच्यां विजयाची लढाईचे साक्षीदार किल्ले शिवपट्टण तसेच रणटेकडीच्या शौर्य स्थळांची माहीती होते.
शेवटी शिवरायांचे आठवे रूप घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here