जामखेड न्युज——
विकास कामात आमदार रोहित पवार म्हणजे लंबी रेस का घोडा – रमेश आजबे
एक दुर्लक्षित मतदारसंघ असलेल्या कर्जत जामखेड मध्ये आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात व दर्जेदार विकास कामात राज्यात आघाडीवर राहिला, रस्ते, वीज, पाणी या मुलभूत गरजा ओळखून त्यावर भर दिला आणी मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलू लागला विकास कामाबद्दल आमदार रोहित पवार म्हणजे लंबी रेस का घोडाच म्हणाले लागेल असे सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
सहा डिसेंबर रोजी नागेश विद्यालय, कन्या विद्यालय येथे स्वच्छता गृह शुद्ध पेयजल योजना अद्ययावत सुविधांचा लोकार्पण सोहळा सिने अभिनेत्री गौरी नलावडे यांच्या उपस्थितीत आमदार रोहित पवारांच्या शुभहस्ते होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे नेतृत्त्व हे केवळ कर्जत-जामखेडपुरते मर्यादीत नाही तर एक ‘लंबी रेस का घोडा’ म्हणूनच त्यांच्याकडे पहायला पाहिजे. त्यांची आतापर्यंतची वाटचाल पाहिली तर हेच दिसते. आतापर्यंत कर्जत-जामखेड हा मतदारसंघ राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी एक होता. थोडक्यात सांगायचे तर अदखलपात्र असंच कर्जत-जामखेडकडे पाहिले जात होते. परंतु रोहित पवार हे आमदार झाल्यानंतर २०१९ नंतरच कर्जत-जामखेड हा मतदारसंघ राज्याच्या राजकीय क्षीतिजावर ठळकपणे पुढे येत असल्याचे दिसते. येथील विकासकामांनी घेतलेले बाळसे हे एक कारण तर आहेच.. पण कालच्याच एका घटनेचा उल्लेख प्रकर्षाने करण्याचा मोह होतो.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भाज्यपालासारखे काम करणाऱ्या राज्यपालाने अनुद्गार काढले आणि राज्यात एकच संतापाची लाट उसळली. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने संताप व्यक्त करत आहे. याला अपवाद आहे फक्त भाजपातील नेते.
आमदार रोहित पवार यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू (बुद्रुक) येथील समाधीस्थळी आत्मक्लेश आंदोलन केले. त्यांच्या एका हाकेला राज्यातील दहापेक्षा अधिक आजी-माजी आमदारांनी ओ देत या आंदोलनात सहभाग घेतला. यावरुन रोहित पवार या नावाची ताकद राजकीय भविष्यकारांच्या लक्षात आलीच असेल. पहिल्या टर्मचा आमदार एक हाक देतो आणि असंख्य लोक आणि दहाहून अधिक आजी-माजी आमदार त्यांना प्रतिसाद देतात, ही राजकीय वर्तुळातील दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. मला तर असे वाटते की, रोहित पवार यांनी केवळ कर्जत-जामखेड या आपल्या एका मतदारसंघात अडकून पडू नये.
त्यांच्यात उंच झेप घेण्याची क्षमता आणि कर्तृत्त्वही आहे. मतदारसंघासोबतच राज्याचे अनेक प्रश्न त्यांनी सरकारकडे मांडल्याचे आणि त्यातील काही सुटल्याचेही अनेकदा दिसले आहे. यावरुन रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडच्या रस्त्याने चालण्याऐवजी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ‘मेगा एक्सप्रेस वे’ने जावे असेच त्यांच्याकडे पाहून वाटते. शिवाय कर्जत-जामखेडच्या जनतेनेही या नेतृत्त्वाला मतदारसंघात अडकून न ठेवता राज्य पातळीवर झेप घेण्यासाठी पतंगाप्रमाणे ढिल देण्याची गरज आहे. जेवढी ढिल मिळेल तेवढा कर्जत-जामखेडचा हा पतंग उंच जाईल, असे वाटते आणि यातच कर्जत-जामखेडसोबतच महाराष्ट्राचेही हीत आहे यात कोणतीही शंका नाही.