जामखेड न्युज——
आदिवासी बांधवांचा जीव घेणाऱ्या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यावर 302 चा गुन्हा दाखल करा
ॲड.डॉ.अरुण (आबा)जाधव
बीड जिल्ह्यातील वासनवाडी येथील आदिवासी बांधव आप्पा पवार याला शासनाचे घरकुल मंजूर झाले असल्यामुळे त्यांनी घराचे काम पण चालू केले होते, तीन हप्ते जमाही झाले परंतु घराचे काम पूर्ण होऊनही चौथा हप्ता मिळावा म्हणून ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे अनेक वेळी गेला होता. प्रस्थापित पुढाऱ्यांना ही भेटला होता परंतु न्याय कुठेच मिळाला नाही. म्हणून घरकुलाचा चौथा हप्ता मिळावा म्हणून बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषणासाठी आप्पा पवार बसले होते त्यांच्याकडे कोणत्याच पुढाऱ्याचे अधिकाऱ्याचे व शासनाचे लक्ष गेलं नाही या शासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी बांधव आप्पा पवार यांचे मंजूर झालेल्या घरकुलांचे हप्ते मिळावे म्हणून शासन दरबारी स्वतःचा जीव गमवावा लागला.
बीड जिल्ह्यातील पुढारी व प्रस्थापितांनी गोरगरीब आदिवासी जनतेचा कधीच विचार केला नाही गायरान जमीन मिळू दिली नाही नाव फक्त गोरगरिबांचे आणि लूट प्रस्थापिताची गोरगरिबांचा विचार केला जातो फक्त मतदानासाठी स्वतःच्या हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषणासाठी बसलेला आदिवासी बांधव आप्पा पवार याचा मृत्यू झाला आहे.
या आदिवासी बांधवांची दखल न घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याचा निषेध ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांच्या वतीने करण्यात येत आहे,