जामखेड न्युज——
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव, ता. जामखेड येथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ग्रामस्थांनी केली लोकवर्गणीतून वर्गखोल्यांची सोय…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव, ता.जामखेड, जि.अहमदनगर येथे इयत्ता- 1 ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग असून शाळेची एकूण पटसंख्या 200 च्यापुढे आहे तसेच गेल्या वर्षी शाळेची इमारत धोकादायक झाल्याकारणाने शाळेच्या वर्गखोल्या पाडण्यात आलेल्या होत्या.
वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खूप अडचणी येत आहेत तसेच शासनाकडून नवीन वर्गखोल्या मंजूर होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे हि गोष्ट लक्ष्यात आल्यानंतर धामणगावातील संपूर्ण ग्रामस्थ एकत्र आले व संपुर्ण ग्रामस्थांच्या पुढाकारातून तसेच लोकवर्गणीच्या माध्यमातून सुमारे रु.50,000/- ते रू.75,000/- रकमेचे लोखंडी साहित्य तसेच रू.1,00,000/- ते रू.1,25,000/- एवढ्या रोख रकमेचे शालेय वर्गखोल्यांच्या सोयीकरिता योग्य ते नियोजन करण्यात आले.
सदर कामाचे शुभारंभ धामणगावचे सरपंच श्री.महारुद्र महारनवर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दिगांबर महारनवर, सामाजिक कार्यकर्ते व गावातील मान्यवर श्री. नितीन घुमरे, श्री. अमोल मगर, श्री. सुभाष घुमरे ,श्री.महावीर घुमरे, श्री.सतीश घुमरे, श्री.गणेश थोरात, श्री.पप्पाजी थोरात, श्री.बापूराव घुमरे, श्री.बाबासाहेब महारनवर, श्री.नानासाहेब महारनवर, श्री.हनुमंत घुमरे, श्री.सुजित घुमरे, श्री.बळीराम घुमरे, श्री.गणेश हाळनवर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, धामणगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थितीत तसेच यासर्वांच्या पुढाकारातून करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.रुपेश वाणी सर तसेच शिक्षकवृंद श्री.किसन वराट सर, श्री.नारायण लहाने सर, श्री.चंद्रकांत पांडुळे सर, श्री.गणेश काटे सर, श्री.एकनाथ गायकवाड सर, श्री.अर्जुन होले सर, श्रीमती स्वाती गोरे मॅडम यांनी उपस्थित सर्वांना आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्व ग्रामस्थांनी व मान्यवरांनी शाळेच्या भौतिक सुविधेकरिता भरभरून सहकार्य करावे असे आवाहन केले.