जामखेड न्युज——
राज्य राखीव पोलीस केंद्र कुसडगाव तेथेच रहावे म्हणून सरपंचांच्या शिष्टमंडळाने निवेदन
तालुक्यातील कुसडगाव तेथे राज्य राखीव बल केंद्र मंजूर होऊन काही प्रमाणात कामही झाले आहे पण पुन्हा ते केंद्र जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे चालले आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यावर मोठा अन्याय होणार आहे. तेव्हा ते केंद्र जामखेड तालुक्यातील कुसडगाव तेथेच रहावे म्हणून तालुक्यातील सरपंचांच्या शिष्टमंडळाने राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक एस. एन. सय्यद यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रा. लक्ष्मण ढेपे यांच्या नेतृत्वाखाली
गुरेवाडी – महारूळीचे सरपंच अंजली ढेपे , सावरगाव चे सरपंच काका चव्हाण, कुसडगावचे सरपंच शहाजी गाडे, घोडेगावचे सरपंच शरद जगताप, झिक्रीचे सरपंच दत्ता साळुंखे, पाडळीचे सरपंच बाळासाहेब खैरे, कुसडगावचे उपसरपंच नागेश कात्रजकर, याचबरोबर पोलीस निरीक्षक मधुकर मोर्का, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस नाईक शैलेश शिरसाठ, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक उगले, शिंदे इंजिनिअर, पगार आर्किटेक्चर, सागर कोल्हे, वैभव कार्ले, सुनील कार्ले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक एस. एन. सय्यद यांनी सकारात्मकता दाखवून सांगितले की, सदर निवेदन शासनदरबारी मांडू असे आश्वासन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, राखीव पोलीस बलाचे स्थलांतर न होता ते कुसडगाव ता. जामखेड जि. अहदमनगर येथेच व्हावे.सदर जामखेड तालुका हा दुष्काळी भाग असुन, सदर तालुक्यात बेरोजगारांची संख्या जास्त आहे. सदरचे केंद्र कुसडगाव येथेच व्हावे जेणे करुन जामखेड तालुक्यावर अन्याय होणार नाही.
तसेच सदर केंद्राचे काम जवळ जवळ जवळ ५० ते ७० टक्के झाले असुन त्यावरती शासनाने बराच खर्च देखील केलेला आहे. जर सदचे केंद्र इतरत्र गेले तर जामखेड तालुक्यातुन मोठा उठाव निर्माण हाईल. तरी हे टाळण्यासाठी सदरचे केंद्र जामखेड येथेच राहील यासाठी प्रयत्न करावेत ही नम्र विनंती सरपंचांच्या शिष्टमंडळाने केली आहे.