जामखेड न्युज——
शेतकऱ्यांच्या पिकांची लाईट अभावी नुकसान झाल्यास गाठ माझ्याशी आहे- …… ॲड. डॉ.अरुण जाधव
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप पीक पुर्णपणे वाया गेले रब्बी साठी पाणी असतानाही वीजेच्या अभावी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले तर गाठ माझ्याशी आहे असे मत ॲड. डॉ.अरुण जाधव यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खर्डा येथे रास्ता रोको आंदोलनादरम्यान व्यक्त केले.
आज दिनांक 28 /11 /2022 रोजी बाळगव्हाण, लोणी, वाकी, गोपाळवाडा, दरडवाडी ता. जामखेड गावातील ग्रामस्थांनी खर्डा येथे रास्तारोको आंदोलन केले.या मागण्यामध्ये वरील गावांना कायमस्वरूपी ची थ्री फेज लाईट सोडावी. तसेच कमी दाबाने होणारा बीज पुरवठा पूर्ण क्षमतेने सोडावा या करीता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सर्व शेतकऱ्यांना घेऊन उद्याच्या काळामध्ये मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करन्याचा इशाराही ॲड. डॉ.अरुण जाधव यांनी दिला.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजाबाबत मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. या रस्ता रोको मध्ये लोकाधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते मा.बापू ओहोळ यांनी आपली भूमिका मांडली. ते बोलताना म्हणाले की, शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच्यावर जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट नाही. तसेच शेतकऱ्यांचा प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास मोठ्या स्वरूपात आंदोलन उभा करण्याचे ते यावेळी बोलले.
तसेच बाळगव्हाण चे मा. सरपंच दादा पाटील दाताळ यांनी आपली भूमिका मांडताना शेतकऱ्यांना लाईटच्या समस्यांमुळे येणाऱ्या अडचणी काय आहेत यावर माहिती देऊन सर्वाचे हे लक्ष वेधले.लोकाधिकार आंदोलनाचे तालुका अध्यक्ष विशाल पवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न व लाईटमुळे घडणाऱ्या घटना, मुलांचे अभ्यासाचे होणारे नुकसान या विषयी आपले मत मांडले. नियमित 3 फेज लाईट सध्या देणे शक्य नाही ,कारण विजेचे उत्पादन कमी व वापर जास्त होतोय.मात्र डीम लाईट ऐवजी ती पूर्ण क्षमतेने सोडण्याचे आश्वासन या रास्तारोको आंदोलनात खर्डा सबस्टेशनचे विद्युत महामंडळचे मा.कदम साहेब यांनी दिले,कामगार तलाठी कुळकर्णी साहेब व खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील साहेब यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या रास्तारोको मध्ये बलभीम परकड,गणपत कराळे,नदंराम सावंत,भीमराव सुरवसे, कांतीलाल जाधव, बाळू खाडे,काकासाहेब शिकारे, कृष्णा खाडे,रघुनाथ परकड,सिद्धेश्वर शेंडकर, युवराज कराळे,विकास गोपाळघरे,राहुल दाताळ,राहुल गोपाळघरे,सिताराम खाडे,आदित्य गंगावणे आदी लोक रास्तारोकोला उपस्थित होते.