रत्नदीप’ संस्थेचे कार्य दिशादर्शक…! पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव

0
158

 

जामखेड न्युज——

‘रत्नदीप’ संस्थेचे कार्य दिशादर्शक…!
पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. आण्णासाहेब जाधव

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेचा 22 वा वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रमांना साजरा

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेचे कार्य सर्वांना दिशादर्शक आहे असे गौरवोद्गार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.आण्णासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. ते रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या बावीसाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री.आण्णासाहेब जाधव यांचे सह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील,सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील,भारतीय स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक मा.श्री.निमराज मोहळकर, पंचायत समिती जामखेडचे गटविकास अधिकारी मा.श्री. प्रकाश पोळ, भारतीय स्टेट बँक जामखेड शाखाधिकारी श्री. अभिषेक भालेकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याबाबत सविस्तर माहिती की रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर ही संस्था गेल्या बावीस वर्षांपासून जामखेड-कर्जत तालुक्यात विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवित आहे. रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात बीएचएमएस,नर्सिंग व फार्मसी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय असून याठिकाणी राज्यातील विविध जिल्ह्य़ातील जवळपास बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्थेच्या वतीने एक लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले असून त्याअंतर्गत वीस हजारांपर्यंत आरोग्य विषयक उपचार देखिल मोफत केले जाणार आहेत.

यावेळी बोलताना जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.प्रकाश पोळ म्हणाले की रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलातील बीएचएमएस नर्सिंग व फार्मसी महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. या ठिकाणी विद्यार्थी-विद्यार्थीनीच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येते ही विशेष बाब आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील हे सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत असे गौरवोद्गार ही श्री. प्रकाश पोळ यांनी व्यक्त केले.
चौकट क्रमांक.1:-
‘रत्नदीप’ शैक्षणिक संकुलात होमिओपॅथिक,नर्सिंग,फार्मसी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय असून याठिकाणी राज्यातील विविध जिल्ह्य़ातील जवळपास बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

चौकट क्रमांक 2 :-

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त रत्नदीप शैक्षणिक संकुलातील सर्व विद्यार्थ्यांना विमा संरक्षण दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांचे आभार…!!
कु.सुप्रिया शेवाळकर
प्रथम वर्ष,रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज
रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर

 

चौकट 3 :-

“संस्था अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर ता.जामखेड या संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त रत्नदीप शैक्षणिक संकुलातील बीएचएमएस,फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकी रूपये एक लाख रक्कमेचा विमा उतरविण्याचा घेतलेला निर्णय हा आमच्या साठी उत्साहवर्धक व भावनिक आहे. त्याबद्दल सर्वं संस्था अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे यांचे आभार व्यक्त करतो.
सौ.प्रज्ञा पुजारी
प्राचार्या रत्नदीप नर्सिंग कॉलेज रत्नापूर
तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here