जामखेड न्युज——
राष्ट्रीय छात्रसेनेच्या अमृत महोत्सवाच्या पुर्वसंधेला शिवपट्टन खर्डा येथे एनसीसी मार्फत स्वच्छता अभियान
राष्ट्रीय छात्र सेना-आर्मीच्या वतीने किल्ले खर्डा येथे स्वच्छता अभियान संपन्न. राष्ट्रीय छात्र सेनेचे 75 व्या वर्षात पदार्पणा निमित्त स्वच्छता अभियान. एनसीसीची एकता आणि अनुशासनची स्वच्छता अभियानातून खर्डेकरांना अनोखे झाले दर्शन…
राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना 1948 नोव्हेंबर महिन्यात चौथा रविवारी झाली. 27 नोव्हेंबर ला एनसीसी ची अमृत महोत्सव वर्षाची सुरवात होत आहे. एनसीसी ही जगातील सर्वात मोठे युनिफॉर्मधारी संघटना आहे. भूदल, वायुदल ,नौदल या आर्मीचे एनसीसी युनिट आहेत. या निमित्ताने सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अ.नगर चे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष यांच्या आदेशानुसार व एनसीसी ऑफिसर कॅप्टन गौतम केळकर, सेकंड ऑफिसर अनिल देडे, थर्ड ऑफिसर मयूर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्या खर्डा( शिवपट्टण) येथे स्वच्छता अभियान व खर्डा शहरातून प्लास्टिक निर्मूलन जनजागृती रॅली संपन्न झाली.
जामखेड मधून स्वच्छता जनजागृती रॅलीचे उद्घाटन नायब तहसीलदार मनोज भोसेकर व प्राचार्य डोंगरे एम. एल., प्राचार्य मडके बी के, प्राचार्य श्रीकांत होशिंग सैनिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग डोके, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, रघुनाथ मोहोळकर, आप्पासाहेब पारखे यांच्या हस्ते करण्यात आले.
खर्डा शहरातून प्लास्टिक निर्मूलन जागृती, स्वच्छता अभियान रॅलीने खर्डा शहरात जनजागृती केली. यावेळी स्वच्छ खर्डा सुंदर खर्डा, एक कदम स्वच्छता की ओर ,ऐतिहासिक वास्तूचे जतन करा, प्लॅस्टिक मुक्ती झालीच पाहिजे अशा घोषणेने खर्डा शहर दुमदुमून निघाले.
यावेळी खर्डामध्ये प्लॅस्टिक निर्मूलन रॅलीचे उद्घाटन सरपंच गोपाळघरे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के,ग्रामपंचायत सदस्य मदन गोलेकर, प्राचार्य सोमनाथ उगले, पत्रकार दत्तराज पवार, अनिल धोत्रे, संतोष थोरात क्रांतिवीर अकॅडमीचे संचालक मेजर रावसाहेब जाधव , प्रा जवळेकर ,पोलीस विभाग ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेड महाविद्यालय, ल ना होशिंग विद्यालय व रयतचे नागेश विद्यालय जामखेड च्या १५० एनसीसी छात्रांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
तसेच खर्डामध्ये सामाजिक संघटना कार्यकर्ते, ग्रामस्थ व श्री संत गजानन कॉलेज व आष्टी मधील हंबर्डे कॉलेज यांनी स्वच्छता अभियान मध्ये सहभाग घेतला.
खर्डा किल्ल्यामध्ये एनसीसी कॅडेटनी अनावश्यक गवत केर कचरा ,अनावश्यक झाडे झुडपे, प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा स्वच्छ एकत्रित करून योग्य विल्हेवाट लावली. व सिताराम गडावरील संपूर्ण गडाचे अनावश्यक प्लॅस्टिक कचरा संकलन करून योग्य विल्हेवाट लावली.
जामखेड चे नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांनी एनसीसीला 75 वर्षात पदार्पण करत आहे याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.
खर्डा चे सरपंच आत्माराम गोपाळघरे यांनी मी ही एक एनसीसी कॅडेट आहे व एनसीसी हे अतिशय शिस्तबद्ध व राष्ट्राचे भविष्य घडवणारी युनिफॉर्मधारी संघटना आहे. खर्डेकरांना एनसीसीची एकता आणि अनुशासनची स्वच्छता अभियानातून अनोखे दर्शन झाले. असे मनोगत व्यक्त केले. एनसीसीच्या आव्हानाला खर्डेकरांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला व स्वच्छता अभियान मध्ये सहभाग घेतला.