Friday, February 13, 2026
Home शैक्षणिक बातम्या पावसाळी क्रीडा स्पर्धेत साकेश्वर विद्यालयातील मुलींचे घवघवीत यश

पावसाळी क्रीडा स्पर्धेत साकेश्वर विद्यालयातील मुलींचे घवघवीत यश

0
302

जामखेड न्युज——

पावसाळी क्रीडा स्पर्धेत साकेश्वर विद्यालयातील मुलींचे घवघवीत यश

तालुकास्तरीय सांघीक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या यात रिले सांघिक व धावणे, लांब उडी या वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत श्री साकेश्वर विद्यालयाच्या मुलींनी घवघवीत यश संपादन केले आहे यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या यामध्ये शिऊर येथील भैरवनाथ विद्यालयात कबड्डी तर पिंपळगाव उंडा येथील चन्नापा विद्यालयात खो-खो स्पर्धा संपन्न झाल्या होत्या. तर वैयक्तिक स्पर्धा नागेश विद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाल्या यात श्री साकेश्वर विद्यालयाच्या मुलींनी घवघवीत यश संपादन केले आहे.

४/१००या रिले सांघिक खेळात १४ वर्षे वयोगटात श्री साकेश्वर विद्यालयाच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला यात सोनाली लहाने, अंजली वराट, सानिका वराट, निर्मला सरोदे यांनी सहभाग घेतला होता.

तसेच वैयक्तिक स्पर्धेत
२०० मीटर धावणे १४ वर्षें वयोगटात सोनाली लहाने हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला

४०० मीटर धावणे मध्ये गीतांजली दादासाहेब वराट हिने दुसरा क्रमांक पटकावला

लांब उडी व २०० मीटर धावणे या दोन्ही प्रकारात दिपाली हनुमंत वराट हिने तिसरा क्रमांक पटकावला. विद्यालयाच्या मुलींना क्रीडा शिक्षक राजकुमार थोरवे यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थीनींचे अभिनंदन दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक तसेच मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघ सर्व सदस्य तसेच पालकांनी अभिनंदन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!