जामखेड न्युज——
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा. अरूण वराट यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांना पाणी बाँटल व खाऊचे वाटप
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखे यांचा वाढदिवस नगर जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जामखेड तालुक्यात सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. साकत परिसरातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांना प्रा. अरूण वराट यांच्या तर्फे शालेय साहित्याचे पाणी बाँटल, व खाऊचे वाटप करण्यात आले साहित्य मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.
यावेळी चेअरमन कैलास वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, हरीभाऊ मुरूमकर, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, व्हाइस चेअरमन दादासाहेब नेमाने, सेवा संस्थेचे संचालक, नानासाहेब लहाने, महादेव वराट, युवराज वराट, प्रगतशील शेतकरी अविन लहाने, दिलीप घोलप, जालिंदर नेमाने,संतोष नेमाने, भाऊसाहेब लहाने, पोपट वराट, पांडुरंग सानप, दादासाहेब नेमाने, श्रीकृष्ण पुलवळे, संदीप वराट यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.
श्री साकेश्वर विद्यालयात साहित्य वाटप करताना मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
साकत परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकत, जिल्हा परिषद शाळा कडभनवाडी, जिल्हा परिषद शाळा हनुमान वस्ती, जिल्हा परिषद शाळा कोल्हेवाडी, जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी, जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडी, श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रा. अरूण वराट यांच्या सौजन्याने पाणी पिण्यासाठी बाँटल व खाऊचे वाटप करण्यात आले.