महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बसणाऱ्या पेशन्ट कडून हजारो रूपये घेणार्‍या तसेच शासन व पेशन्ट दुहेरी लूट करणाऱ्या इंदिरा हाॅस्पिटल वर योग्य ती कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार – तालुकाध्यक्ष मंगेश आजबे

0
403
जामखेड प्रतिनिधी 
                  जामखेड न्युज – – ( सुदाम वराट ) 
    गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना आणली व शहरातील काही हाॅस्पिटल मध्ये या योजनेचा समावेश केला या योजनेखाली गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा मोफत मिळतात पण जामखेड शहरातील इंदिरा हाॅस्पिटल मध्ये या योजनेत बसणारे लाभार्थी यांच्या कडूनही हजारो रूपयांचे बील घेतात त्यामुळे शासनाचाही निधी हडप करतात व लाभार्थी धारकांकडूनही पैसे घेतात. इंदिरा हाॅस्पिटलने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बसणारे लाभार्थी ज्यांची फसवणूक झाली आहे.यांचे पैसे ताबडतोब परत करावेत व हाॅस्पिटलची मान्यता रद्द करावी
अशी मागणी योजनेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे केली आहे. फसवणूक झालेल्यांचे पैसे परत न मिळाल्यास  तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
       यावेळी बोलताना संभाजी डोके म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य योजना जामखेड येथे इंदिरा हॉस्पिटल  या ठिकाणी कार्यन्वीतअसुन सदर योजने अंतर्गत माझी पत्नी सौ. भाग्यश्री संभाजी डोके हिस आम्ही दि. १९/०३/२०२१ रोजी बाळंतपणाच्या कामी अॅडमिट केले होते व वरील योजनेची फाईल केलेली होती. माझी पत्नीचे सिझर करावे
लागेल असे डॉक्टरांनी सांगितले सिझरसाठी एक रुपयाही खर्च येणार नाही परंतु फाईल प्रोसेसिंगसाठी
५,०००/- रु भरा असे सांगितले म्हणुन ५,०००/- रु जमा केले व सिझर केले व मुलगी झाली बाळाचे
वजन ३.३ कि. भरले असताना व काचेच्या पेटीत (NICU) मध्ये बाळाला ठेवण्याची गरज नसताना सुध्दा ३-४ दिवस ठेवण्यातआले. व कुठलाही उपचार केलेला नाही. तसेच या उपचारासाठी तुम्ही १५,०००/- जमा करा असे सांगितले व
ते सर्व पैसे मी भरले तसेच सदर योजना अंतर्गत कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही परंतु इंदिरा हॉस्पिटलमधील कर्मचारी अशोक रामदास डोके (मो.नं. ९८२२११३९४४) याच्याकडे व डॉक्टरांकडे मी माझ्या मुलीच्या जन्मापासुन ते डिस्चार्ज देईपर्यंत एकुण मेडिकलसाठी ३,०००/- घेतले असे एकुण माझ्याकडुन २३,०००-/ घेतलेले आहेत. तरी या योजना अंतर्गत माझी फसवणुक झालेली असुन या योजने बाबत मला पुर्ण माहिती असुन माझी पत्नी व बाळाच्या जिवीतासाठी मी वरील रक्कम भरलेली आहे. अशाच प्रकारे इतर पेशन्टची फसवणुक होत आहे. तरी मी भरलेली रक्कम मला परत मिळावी. वरील रकमा भरलेल्या बाबत माझेकडे फोनमध्ये रेकॉर्ड उपलब्ध आहे. सदर अर्जाची सखोल चौकशी करावी व माझी भरलेली रक्कम मला परत मिळावी  असे सांगितले. तसेच मुख्याधिकारी जामखेड नगरपरिषद यांच्याकडे अर्ज केला आहे व अर्जाच्या प्रती, जिल्हाधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक यांना पाठविलेल्या आहेत.
     यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे म्हणाले की, गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने ही योजना सुरू केली आहे परंतु जामखेड शहरातील इंदिरा हाॅस्पिटल मध्ये या योजनेखाली उपचार करणार्‍या पेशन्ट कडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळतात तेव्हा गोरगरीब जनतेला न्याय मिळाला आतापर्यंत शासनाकडून व पेशन्ट कडूनही दुहेरी लाभ घेणाऱ्या हाॅस्पिटल कडून सर्व वसुली करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे असा इशारा त्यांनी दिला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आसतानाही इंदिरा हाॅस्पिटललाच का महात्मा फुले जनआरोग्य योजना दिली आहे असा प्रश्न लोक विचारत आहेत. शासनाची व जनतेची फसवणूक करणाऱ्या हाॅस्पिटलवर योग्य कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here