ग्रामपंचायत सदस्य आरती देवमाने यांचे महावितरण विरोधात उद्या ठिय्या आंदोलन. 

0
206
जामखेड प्रतिनिधी 
     जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
   दोन दिवसात शेती पंपाचा विज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यलयासमोर दि ८ मार्च रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन दि ५ एप्रिल रोजी महावितरण ला दिले होते. त्यानुसार जवळा ग्रामपंचायतचे सदस्य असलेल्या आरती दिपक देवमाने  यांनी इशारा दिला होता त्यानुसार दि ८ एप्रिल रोजी  सकाळी साडे दहा वाजता महावितरणच्या जामखेड कार्यलयात ठिय्या आंदोलनाला बसणार आहे.
            जवळा परीसरातील  शेतीपंपाची वीज गेल्या दोन – तीन महिन्यापासून विजेच्या कमी दाबामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे विजे आभावी मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे . तसेच विजेचा कमी दाब येत असल्यामुळे शेती पंप , तसेच रोहित्र निकामी होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी पिके पाणी असताना वीजे आभावी जळत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे ठाकले आहे . रोहित्र जळाले तरी शेतकरी वर्गणी करून भरत आहेत एक रोहित्र भरण्यासाठी ४० ते ५० हजार रुपये खर्च येत आसताना महावितरण याची दखल घेत नाही. शेतीसाठी होणारा बीज पुरवठा पूर्ण दाबाने दोन दिवसात सुरळीत झाला नाहीतर मी आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे असल्याचे आरती दिपक देवमाने यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here