जामखेड न्युज——
बीडचा शुभम कर निरीक्षक परिक्षेत राज्यात पहिला
सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. खरतड अशा परीक्षांना सामोरं जातात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. बीडमधील एका तरुणानं देखील मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केलं आहे. या तरुणानं फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात कर निरीक्षक म्हणून पहिला क्रमांक पटकवला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात बीडच्या शुभम प्रताप पाचंग्रीकर याला घवघवीत यश मिळालं आहे. एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. काही विद्यार्थ्यांना यश संपादन होते तर काही विद्यार्थ्यांना अनेकदा वर्षानुवर्ष मेहनत घ्यावी लागते. सरकारी नोकरी किंवा सरकारी अधिकारी व्हावे, अशी इच्छा अनेक तरुणांची असते. असा तरुणांसाठी शुभमची कहाणी प्रेरणादायी आहे.
एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या एसआयटी परीक्षेचा निकाल लागला. यात शुभमला 306 मार्क मिळालं आहेत. या गुणांसह शुभमने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2020 साली शुभमने ही परीक्षा दिली होती. शुभमच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.