जामखेड न्युज——
वीजचोरी पकडण्यासाठी गेलेल्या अभियंत्यास मारहाण
जामखेड तालुक्यातील पाटोदा गरड येथील घटना तीन जणांवर गुन्हा दाखल
तालुक्यातील पाटोदा गरड येथे विद्युत तारेवर आकडा टाकून विजेची चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अरणगाव कक्ष साहाय्यक अभियंता व वरिष्ठ तत्रंज्ञ यांना दगडाने मारहाण करून जखमी केले या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यातील पाटोदा गरड येथे महावितरण कंपनीच्या विजेच्या साहित्याचे कुठे नुकसान झाले आहे का? किंवा कोणी बेकायदेशीर वापर करत आहेत का हे पाहण्यासाठी गेलेले जामखेड उपविभागातील अरणगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता व वरिष्ठ तंत्रज्ञ विठ्ठल शिवाजी खुणे यांना विजेचा बेकायदेशीर वापर करणाऱ्यांनी घाण घाण शिवीगाळ करून पुष्कराज हरीचंद्र मेंगाळ शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण केली यावरून आरोपींविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे जामखेड उपविभागातील अरणगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता पुष्कराज हरीचंद्र मेंगाळ (वय 32) व वरिष्ठ तंत्रज्ञ – विठ्ठल शिवाजी खुणे हे दोघे काल दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० वाजताचे सुमारास आपल्या कार्यक्षेत्रातील पाटोदा (ग) या गावातील लाईटचा खांब कोठे जमिनीवर पडला आहे काय, कोणाचे फॉल्टी मीटर आहे काय याची तपासणी तसेच कोणी लाईटचे तारेवरून अथवा खांबाजवळून अनाधिकृत आकडा टाकून लाईट वापरत आहे अगर कसे याबाबत ची खात्री करून त्यांचेवर कारवाई करणेकरीता व शासकिय काम करणेकरीता गावात पायी चालत खात्री करत होते. पाटोदा ते अरणगाव जाणारे रोडलगत पायी चालत असताना अरणगावकडे जाताना डावे बाजूला लाईटचे तारेवरून कोणीतरी आकडा टाकलेला त्यांना दिसला म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जावून आकड्याची खात्री केली असता तारेवरील आकडा टाकलेली वायर ही एका पञ्याचे टपरीच्या आत गेलेली दिसली. ती टपरी उघडी असल्याने त्यांनी आत मध्ये जावून पाहीले असता सदर आकडा टाकलेल्या वायरचे पुढे एक बल्ब लागलेल्या स्थितीत दिसला व त्या टपरीमध्ये एक इसम बसलेला दिसला म्हणून त्यांनी त्या इसमास स्वतःचा परिचय दिला व त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्यांचे नाव इरफान पिरखान पठाण असे सांगितले असता. सहाय्यक अभियंता पुष्कराज हरीचंद्र मेंगाळ (वय 32) व वरिष्ठ तंत्रज्ञ – विठ्ठल शिवाजी खुणे हे त्यांस, तुम्ही असे अनाधिकृत लाईटचा आकडा टाकून लाईट का वापरता असे विचारले असता तो इसम म्हणाला की, तुम्ही कोण मला विचारणारे, तुम्हाला कारवाई करायची असेल तर शेतात जा, दुस-यांचे लाईट चे आकडे पहा असे म्हणून मेंगाळ यांना घाण घाण शिवीगाळ केली त्यावर त्यांनी त्यांस समजावून सांगत आम्ही – शासकिय कामे करत आहोत.
आम्हाला शासकिय कामे करताना कोणता अडथळा आणू नका असे सांगत असताना त्याने मेंगाळ यांची गचांडी धरून जमीनीवर खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण करून तु येथून कसा जातो. हे पाहतो असे म्हणून त्यांने आणखी दोन जनांना तेथे बोलावून घेतले. त्यानंतर तेथे दोन इसम आले व त्यांनी काही एक विचार न करता त्या दोघांना घाण घाण शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली व इरफान पीरखान पठाण यांने टपरीजवळ पडलेल्या दगड हातात घेवून मेंगाळ यांच्या पाठीवर व हातावर मारहाण केली असून तेथून ते दोघेही कर्मचारी जवळच असणारे ओळखीचे गफार मद्देखान पठाण यांचे दुकानावर पळत गेले व टपरीजवळ जावून थांबले त्यानंतर तेथे लोक गोळा झाल्याने तेथेही त्यांना शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण केली असून तेथे उपस्थित गफार मद्देखाँन पठाण, गौतम हिरामण काळे व इतर लोकांनी सोडवा सोडव केली आहे. सदर ठिकाणी बरेच लोक गोळा झाल्याने तेथून वरील तिघेजण निघून जावू लागले व जाताना आम्हाला म्हणाले की, तुम्ही आज वाचलात, परत सापडलास तर जिवे मारत असतो. असे म्हणून निघून गेले त्यानंतर आम्ही जामखेड ला येत असताना पाटोदा गावात स्टॅण्डवर जमलेल्या लोकांकडून मला इतर दोन जणांचे नावांची माहीती मिळाली असून त्यांचे नावे. 1) पिरखान ईस्माईल पठाण 2) सादाफ ईब्राहीम पठाण दोघे रा. पाटोदा (ग) ता. जामखेड असे असल्याची खात्रीलायक माहीती मिळाली आहे. झालेल्या भांडणात वीज कर्मचारी यांना तोंडावर, दोन्ही हाताला व पाठीवर मुकामार लागल्याने पोलिसांनी दवाखाना मेमो दिला व त्यांनी शासकिय दवाखान्यात जावून औषधोपचार घेतला आहे.
यानुसार वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पुष्कराज हरीचंद्र मेंगाळ वय 32 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी इरफान पीरखान पठाण, पिरखान ईस्माईल पठाण, सादफ ईब्राहीम पठाण सर्व रा. पाटोदा (ग), ता. जामखेड यांचे विरुद्ध भा. द. वी. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संभाजी गायकवाड हे करत आहेत.