पिकअप चोरी करून पळालेले दोन आरोपी पिकअपसह जामखेड पोलीसांकडुन पाठलाग करून जेरबंद

0
349

जामखेड न्युज——

पिकअप चोरी करून पळालेले दोन आरोपी पिकअपसह जामखेड पोलीसांकडुन पाठलाग करून जेरबंद

पिकअप चोरी गेल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी येथील शेतकरी भीमा भगत यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलीसांना जामखेडच्या दिशेने पिकअप गेल्याची बातमी कळली वाशी पोलीसांनी जामखेड पोलीसांना सांगितले यानुसार जामखेड पोलीसांनी
सापळा रचून दोन आरोपीसह पिकअप पकडले यामुळे जामखेड पोलीसांचे अभिनंदन होत आहे.

सविस्तर माहिती अशी की, भीमा अमृता भगत वय 47 वर्ष व्यवसाय शेती राहणार ज्योतिबाची वाडी तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद यांनी दिनांक 17/11/ 2022 रोजी रात्री दहा वाजता ते दिनांक 18/ 11/ 2022 रोजी सकाळी सहा दरम्यान फिर्यादीचे राहते घरासमोरून महिंद्रा बोलेरो कंपनीचे पांढरे रंगाचे पिकअप सन 2013 चे मॉडेल पासिंग क्रमांक M H -25- P 3206 असा ज्याचे समोरील टपावर मराठीत माऊली कृपा असे नाव लिहलेले अज्ञात आरोपीने चोरून नेला आहे त्यावरून फिर्यादी यांनी वाशी पोलीस ठाणे येथे गु.रं.नं 306/22 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता.

आज दि. 19/11/2022 रोजी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत सायंकाळचे सुमारास पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोकॉ विजयकुमार कोळी, पोकॉ.आबासाहेब आवारे हे पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांना वाशी पोलीस स्टेशनचे पोना/भोसले यांनी फोनवर कळविले की,जामखेडच्या दिशेने वरील वर्णनाचे चोरी झालेले पिकअप आलेले आहे तरी तुम्ही आपले हद्दीत त्याचा शोध घ्यावा अशी माहिती दिल्याने सपोनि सुनिल बडे सो.यांनी पेट्रोलिंग करणारे पोलीस अंमलदार यांना तात्काळ ही माहिती दिली.सदरबाबतचे माहितीवरून जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील जामखेड ते सौताडा रोडने पिकअप गेल्याचे माहिती मिळाली त्यावरून त्या पिकअपचा पाठलाग करून पिकअप व 2 आरोपी यांना साकत फाटा ,जामखेड येथे गाडी आडवी लावुन जागेवर पकडले.त्यांना पकडुन जामखेड पोलीस स्टेशन येथे आणले असता सदर आरोपीना त्यांचे नाव गाव विचारले त्यांनी त्यांची नावे 1)अतुल विक्रम वाघमारे रा.शिवाजीनगर ,बीड जि.बीड ,2)आसाफ दस्तगीर शेख रा. रोहतवाडी, ता.पाटोदा जि.बीड असे सांगितले आहे.तसेच अधिक सखोल चौकशी केली असता त्यांचेवर आजपावेतो गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
1. अतुल विक्रम वाघमारे रा.शिवाजीनगर,बीड जि.बीड यांचेवर दाखल असलेले गुन्हे

1) 51/2010 भादवि कलम 379 गेवराई पो.स्टेशन
2. 65/2010 भादवि कलम 394 , शिवाजीनगर,बीड पो.स्टे

3. 71/2012 भादवि कलम 395 नगर तालुका पो.स्टे

4. 94/2012 भादवि कलम 394 श्रीगोंदा पो.स्टे.
5. 330/2015 भादवि कलम 392 शिरूर पो.स्टे.जि.बीड
6. 373/2015 भादवि कलम 392 शिरूर पो.स्टे.जि.बीड
7. 198/2015 भादवि कलम 395 सातारा
8. 370/2015 भादवि कलम 395, कोतवाली पो.स्टे.
9. 88/2016 भादवि कलम 379 पाटेादा पो.स्टे
10. 198/2016 भादवि कलम 395 सातारा
11. 175/2016 भादवि कलम 379 फलटन
12. 59/2017 भादवि कलम 394 गातेगाव पो.स्टे.लातुर

आरोपी नंबर दोन
आसाफ दस्तगीर शेख रा.रोहतवाडी ,ता.पाटोदा जि.बीड
यांचेवर दाखल असलेले गुन्हे 33/2015 भादवि कलम 379 वैराग पो.स्टे.पंढरपुर
2. 175/2016 भादवि कलम 379 फलटन ,सातारा
3. 411/2016 भादवि कलम 379 शिवाजीनगर ,बीड
4. 59/2017 भादवि कलम 394 गातेगाव ,लातुर
5. 173/2017 भादवि कलम 394 पाथर्डी पो.स्टे.
6. 162/2018 भादवि कलम 379 बीड तालुका पो.स्टे.
7. 382/2018 भादवि कलम 399 शिवाजीनगर,बीड
असे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला सो. अहमदनगर ,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे सो.अहमदनगर ,एस.डी.पी.ओ.श्री.आण्णासाहेब जाधव सो कर्जत विभाग, सहा.पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांचे मार्गदर्शनाखाली पोसई.अनिल भारती ,पोना.अविनाश ढेरे , पोकॉ.विजयकुमार कोळी, पोकॉ.आबासाहेब आवारे,पोकॉ.प्रकाश जाधव , यांनी केली असुन पुढील कार्यवाहीकरीता वाशी पोलीस स्टेशनचे पोना.भोसले व पोकॉ.शेवाळे यांचे ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here