जामखेड न्युज—–
जामखेडच्या दोघांनी पुर्ण केली गोवा आयर्न मॅन स्पर्धा
डॉ. पांडुरंग सानप यांनी दुसऱ्यांना वेळेआधी पुर्ण तर भास्कर भोरे यांनीही पुर्ण केली स्पर्धा
प्रचंड जिद्द व प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशक्य काहीच नाही हे करून दाखवले आहे डॉ. सानप यांनी गोवा येथे १३ नोव्हेंबर रोजी झालेली खडतर अशी आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धा जामखेड येथील डॉक्टर पांडुरंग सानप यांनी वेळेआधी एकतास तर भास्कर भोरे यांनी वेळेच्या आत स्पर्धा पूर्ण केली. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गोवा आयर्न मॅन 2022 ही स्पर्धा गोवा येथील miramar beach वर 13 नोव्हेंबर रोजी संपन्न झाली, यामध्ये 27 देशातील खेळाडू सहभागी झाले होते. आणि यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास शंभर खेळाडू होते. पूर्ण स्पर्धेमध्ये तेराशे खेळाडूंचा सहभाग होता आणि यामध्ये 700 लोकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. त्याचबरोबर मी ही स्पर्धा सात तास 42 मिनिटांमध्ये पूर्ण केली यासाठी एकूण वेळ हा आठ तास तीस मिनिटांचा असतो. यामध्ये समुद्रामध्ये स्विमिंग 1.9 किलोमीटर असते त्यानंतर सायकलिंग 90 किलोमीटर व त्यानंतर रनिंग 21 किलोमीटर हे सर्व एका पाठोपाठ एक पूर्ण करायचे असते. ती मी यशस्वीरित्या पूर्ण केली व माझ्याबरोबर माझे मित्र श्री भास्कर भोरे यांनी पण ती यशस्वीरित्या पूर्ण केली ही स्पर्धा यापूर्वी मी गोव्यामध्येच केली होती ही माझी दुसरी वेळ आहे आणि ती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे .यामध्ये माझे मित्र परिवार यांचा फार मोलाचा वाटा आहे.
त्यांची वाटचाल ही तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे गोवा राज्यातील पणजी या ठिकाणी मिरामार समुद्रकिनारी ही आयर्न मॅन स्पर्धा आयोजित केली होती. २७ देशातील स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता तर महाराष्ट्रातील शंभर जण या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये १.९ किलोमीटर जलतरण, ९० किलोमीटर सायकल चालवणे व २१ किलो मीटर धावणे हे सर्व लक्ष न थांबता ८ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करणे आवश्यक होते. हे लक्ष डॉक्टर पांडुरंग सानप यांनी न थांबता ७ तास ४२ मिनिटांमध्ये निश्चित वेळेआधी जवळपास एक तास लवकर पूर्ण केले सौताडा येथील रहिवासी असलेले डॉक्टर पांडुरंग सानप वैद्यकीय व्यवसायानिमित्त जामखेड येथे स्थायिक झालेले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी केवळ व्यायामाच्या उद्देशातून सुरू केलेला धावण्याचा सराव हळूहळू वाढत जाऊन त्यांनी १० किलोमीटर धावण्याचा सराव पूर्ण केला काही वर्षापूर्वी ट्रायथलॉन १.५ किलोमीटर जलतरण ४० किलोमीटर सायकलिंग व १० किलो मीटर धावणे या स्पर्धेत अव्वल स्थान डॉक्टर सानप यांनी मिळवले होते.
डॉक्टर सानप यांनी आत्तापर्यंत धाराशिव, सातारा, नगर, पुणे, मुंबई येथील हाफ मॅरेथॉन २१ किलो मीटर फुल मॅरेथॉन ४२ किलो मीटर अल्ट्रा मॅरेथॉन ५० किलोमीटर व ६० किलोमीटर स्पर्धा अशा अनेक स्पर्धा पूर्ण केल्या आहेत
नऊ सप्टेंबर रोजी लडाख येथे ११ हजार फूट उंचीवर ऑक्सिजनची कमी असतानाही त्यांनी २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन प्रथमता पूर्ण केली होती.
तसेच श्रीनगर ते कन्याकुमारी असाही सायकल प्रवास केलेला आहे.
शहरातील तरुणांना एकत्र करून दरवर्षी एका गडावर सायकल यात्रा काढतात जामखेड ते रायगड अशी सायकल यात्रा काढली होती.
चौकट
शारीरिक तंदुरुस्ती हीच खरी धनसंपदा आहे.
जीवणात सर्व गोष्टी पेक्षा अधिक उत्तम आरोग्य व शारीरिक तंदुरुस्ती हीच खरी धनसंपदा आहे सुरुवातीला हे डॉक्टर सानप व्यायामाच्या आवडीतून सराव करत करत हळूहळू प्रमाण वाढवत जाऊन खडतर असी आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण केली आहे.
चौकट
डाॅ. सानप यांनी शारीरिक तंदुरुस्ती व व्यायामाच्या आवडीतून दररोज सकाळी सायकल चालवत काही किलोमीटर अंतरावर जाऊन व्यायाम व योगासने करतात. सुरुवातीला एकट्याने सुरू केलेल्या या उपक्रमात आज व्यायामाचे महत्त्व पटल्याने दहा जणांचा ग्रुप झाला आहे. नित्यनेमाने हे सकाळी वीस किलोमीटर सायकलिंग व काही अंतर धावणे नंतर योगासने हा उपक्रम रोजच राबवितात.