शिक्षक बँक प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे – बापू तांबे

0
160

जामखेड न्युज——

शिक्षक बँक प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे – बापू तांबे

 

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये संचालक मंडळाबरोबरच बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. बँकेचे सर्व कर्मचारी हे शिक्षकांची मुले आहेत. त्यामुळे त्यांचे योगदान अधिक महत्त्वाचे आहे. बँकेच्या १०४ वर्षाच्या इतिहासामध्ये कर्मचाऱ्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका वेळोवेळी पार पाडलेली आहे. आपल्या सर्वांकडून आम्हाला चांगल्या कारभाराची अपेक्षा आहे. सभासदांना व ठेवीदारांना चांगली सेवा देऊन बँकेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी शिक्षक बँकेच्या कर्मचाऱ्यांना केले.

शिक्षक बँकेचे नूतन संचालक मंडळ व बँक कर्मचारी यांचा संवाद मेळावा रविवारी बँकेच्या मुख्यालयातील कै.भा.दा.पाटील सभागृहामध्ये पार पडला. त्यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बापूसाहेब तांबे बोलत होते. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण हे होते. यावेळी गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे, शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर, बँकेचे सर्व राजी संचालक तसेच बँकेचे नूतन चेअरमन संदीप मोटे, व्हाईस चेअरमन कैलास सारोक्ते,सर्व नूतन संचालक,विकास मंडळाचे नूतन अध्यक्ष विलास गवळी उपाध्यक्ष…सचिव संतोष मगर, खजिनदार सुवर्ण राठोड, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, इतर सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या प्रमुख भाषणात बापूसाहेब तांबे पुढे म्हणाले कि बँकेचे सर्व कर्मचारी ही आपलीच मुले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना कधीही सापत्न भावाची वागणूक दिली नाही. मागील साडेसहा वर्षाच्या काळामध्ये आम्ही कधी त्यांच्या आकसाने बदल्या केल्या नाहीत,कुणालाही त्रास दिला नाही.

 

मात्र काही कर्मचाऱ्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा संदिग्ध भूमिका पार पाडलेली आहे. आगामी काळामध्ये त्यांनी चांगला कारभार करावा. चांगले कामकाज करावे. सभासदांकडून तक्रारी येणार नाही याची काळजी कर्मचाऱ्यांनी घ्यावी. कर्मचाऱ्यांकडून ज्या काही सूचना व मागण्या आलेल्या आहेत त्याचा संचालक मंडळ निश्चितपणे विचार करील आणि बँकेला सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करेल.

अध्यक्षीय भाषणात माजी चेअरमन सलीमखान पठाण यांनी मागील साडेसहा वर्षांच्या कामकाजाचा धावता आढावा घेतला. बँकेचे सर्व कर्मचारी हे गुरुमाऊली परिवाराचा घटक आहेत. त्यांनी हसतमुखाने सभासदांना सेवा द्यावी. बँकेच्या योजना सभासदापर्यंत पोहोचवाव्यात. बँकेमध्ये सेविंग खाती वाढवावीत तसेच आगामी दोन वर्षांमध्ये दोन हजार कोटींचे ठेवीचे उद्दिष्ट साध्य करावे असे आवाहन केले.सातवा वेतन आयोग आम्हाला न सांगता लागू करण्यात आला तरी देखील आम्ही त्याबाबत आक्षेप घेतला नाही कारण आम्ही देखील कर्मचारी आहोत मात्र कर्मचाऱ्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे असे ते म्हणाले.

माजी व्हाईस चेअरमन अर्जुन शिरसाठ यांनी कर्मचाऱ्यांनी कामकाज निरपेक्ष भावनेने करावे,बँकेचे उपक्रम राबविण्यासाठी कटिबद्ध राहावे असे आवाहन केले.
राज्य संघाचे सदस्य आबा दळवी यांनी बँकेमध्ये आता गुरुमाऊली मंडळाची एक हाती सत्ता आहे याची जाणीव कर्मचाऱ्यांनी ठेवावी. कोणीही चुकीचे वागण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा दिला.

बँकेचे माजी चेअरमन गोकुळ कळमकर यांनी बँकेत कर्मचाऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असूनआमच्या मंडळाने कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण केले आहे. बँकेची संगणक प्रणाली बदलण्याची आवश्यकता आहे त्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले.

बँकेच्या नूतन संचालिका सरस्वती घुले व नूतन संचालक अण्णासाहेब आभाळे, बाळासाहेब सरोदे, उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे आदींनी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबद्दल सभासदांमधून चांगल्या प्रतिक्रिया याव्यात अशी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विविध शाखांच्या शाखाधिकार्‍यांनी बँकेच्या कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणी विशद केल्या. विशेषत: बँकेची संगणक प्रणाली ही जवळपास बारा वर्षे जुनी झाली असून त्यामुळे संगणकावर काम करताना अडचणी येतात. त्यासाठी संगणक प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली. सभासदाकडून काही प्रमाणामध्ये अनियमित रोखे करण्याची मागणी केली जाते. त्याला नकार दिल्यास तक्रारी केल्या जातात. यामध्ये सुधारणा करण्याची देखील मागणी केली.

प्रत्येक शाखेचा अहवाल शाखाधिकार्‍यांनी सादर केला. आगामी काळामध्ये कर्मचाऱ्यांना टार्गेट बेस काम दिले जाईल. त्यांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन चेअरमन संदीप मोटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे लेखा विभागाचे संजय चौधरी यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन कैलास सारोक्ते यांनी मानले.कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शाखांचे कर्मचारी उपस्थित होते.

चौकट
संस्था आपली समजा – भालेराव
नूतन संचालक व कर्मचारी संवाद मेळाव्यामध्ये रेणुका मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक प्रशांत भालेराव यांचे प्रेरणात्मक व्याख्यान झाले त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये कर्मचाऱ्यांनी संस्था आपली समजून काम करावे वेगवेगळे दिवस बँकेत साजरी करावेत बँक माझी हा विश्वास बाळगा अशा पद्धतीने काम केल्यास निश्चितपणे बँकेचे अजून प्रगती होईल असे आवाहन केले.

 

आदर्श कर्मचारी पुरस्कार
बँकेचे प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांच्या सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकारू शकत नाही त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षांमध्ये चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कैलासवासी भादा पाटील आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा अशी सूचना माजी चेअरमन सलीमखान पठाण यांनी केली त्याला सभागृहाने टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here