जामखेड न्युज——
गोरगरिबांना आधार देण्यासाठी गावोगावी बैठका घेऊन धीर देत आहेत अनाथांचा नाथ ॲड.डॉ.अरुण जाधव
गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना आधार देण्यासाठी गावोगावी बैठका घेऊन धीर देत आहेत अनाथांचा नाथ ॲड.डॉ.अरुण जाधव
महाराष्ट्र शासनाने अतिक्रमण धारकांना उघड्यावर सोडू नये
गायरान जमिनीवरील अतिक्रमणा बाबत गोरगरिबांना आधार देण्यासाठी शासनाने सर्वोच्च न्यायालयात जावे सध्या गोरगरिब जनता खुपच भयभीत झाली आहे. यांना आधार देण्यासाठी गावोगावी जाऊन बैठका घेत सर्व सामान्य जनतेला आधार देण्याचे काम अनाथाचे नाथ ॲड.डॉ.अरुण जाधव हे करत आहेत.
निलेशजी (भाऊ) गायवळ व सचिन गायवळ (सर) औखंदे समर्थक सोनेगावचे (सरपंच) मा.पद्माकर बिरंगळ यांच्या उपस्थितीमध्ये सोनेगाव येथील ज्या लोकांनी गायरान जमीन पडीक जमीन खसुन पिकवून खात आहे.व त्यांची घरे तेथे उभा आहेत.अशा सोनेगावातील लाभ धारकांची बैठक घेण्यात आली आहे.
सोनेगावातील अतिक्रमण लाभ धारकांचा जीव कासावीस झाला आहे.की पन्नास वर्षापासून त्या जागेत राहायचे कुडाचे घर,पत्र्याचे घर,स्लॅबचे घर आहे. हे उभा करण्यासाठी हाडाचे काड रक्ताचे पाणी… करून कसेबसे घर उभा केले .तेही अतिक्रमणात जाणार म्हटल्यावर अगदी अतिक्रमण धारकांचा गोंधळच उडाला काही जण रडत आहे. काही जण जेवत करत नाही.
मग अतिक्रमण लाभ धारकाला धीर भरोसा व त्यांच्या बाजूने उभा राहणारे जामखेड तालुक्यातील पुढारी कोठे गेले ?
गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या बाजूने सतत रस्त्यावर रात्री-अहोरात्री अतिक्रमण लाभ धारकांला धीर देणारा निधड्या छातीचा नेता ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव
यांनी सोनेगाव येथे बैठक घेऊन मुंबई हायकोर्टाचा अतिक्रमण धारकांच्या विरोधात दिलेल्या निकाला बाबत सविस्तर मांडणी केली.आपण सगळेजण गोरगरीब कष्टकरी यांच्या बाजूने महाराष्ट्र सरकारने जाऊन अतिक्रमण धारकांची बाजू मांडावी व अतिक्रमण जैसे ते ठेवून नियमानकूल करावे या सर्व मागणीसाठी दि.15/ 11/ 2022 रोजी जामखेड तहसील कार्यालया समोर सरकारला विनंती करण्यासाठी निदर्शने आंदोलन ठेवले आहे.यासाठी अतिक्रमण धारकांच्या बैठका चालू केल्या आहे.अशी माहिती अंकुश पवार यांनी दिली.
यावेळी उपस्थित मा. पद्माकर बिरंगळ (सरपंच) मा.लखन मिसाळ (उपसरपंच) विलास मिसाळ, संदीप साळवे गावातील संपूर्ण अतिक्रमण लाभधारक माताभगिनी व पुरुष उपस्थित होते.