जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
प्रदुषण मुक्त भारत व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी काश्मिर ते कन्याकुमारी निघालेल्या दोन सायकलस्वरांनी दहा राज्यातून प्रवास करत 3800 किलोमीटर अंतर पार करत सतराव्या दिवशी कन्याकुमारीला यशस्वीपणे पोहचले.
काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सायकलवर निघालेल्या प्रदुषण मुक्त भारत व इंधन बचतीचा नारा देत जामखेडचे दोन तरूण 18 मार्च रोजी काश्मीर वरून निघाले होते व 3 एप्रिल रोजी कन्याकुमारीला पोहचले सतरा दिवसात 3800 किलोमीटरचा प्रवास या सायकल स्वरांनी केला आहे. यशस्वी प्रवास निर्धारित वेळेपेक्षा तीन दिवस अगोदरच पुर्ण केल्याबद्दल त्यांच्यावर सोशल मिडीयावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे

प्रदूषण मुक्त भारत, इंधन बचत हा नारा आहे, हा प्रवास 10 राज्य मधून प्रवास करत 3800 किलोमीटर अंतर सतरा दिवसात पुर्ण केले आहे दक्षिणेकडे तापमान जास्त तर काश्मीर मध्ये फार थंडी होती, अणि राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात 36 ते 42 अंश सेल्सिअस पर्यत तापमान होते तरीही या वातावरणाशी जुळवून घेत हा सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

जामखेड येथील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. पांडुरंग सानप व केमिस्ट असलेले भास्कर भोरे हे दोन साहसवीर”सायकल रायडींग” अर्थात सायकल वरून प्रवास पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी तब्बल 3800 किलोमीटरचा प्रवासाचे ध्येय ठेवून काश्मीर ते कन्याकुमारी असा देशांच्या दोन टोकांचा प्रवास करत जनजागृती करण्यासाठी सायकल प्रवास केला आहे.

के 2 के म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी अशी त्यांची सायकल यात्रा असून दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता जामखेड शहरातील एच. यु. गुगळे पतसंस्थेपासून हिरवा झेंडा दाखवून या सायकल स्वरांना निरोप देण्यात आला होता. त्यांनी काश्मीर मधुन 18 मार्चला सायकल प्रवासाला निघाले व 3 एप्रिल रोजी कन्याकुमारीला पोहचले
डॉ. सानप यांनी आतापर्यंत आयर्न मॅन स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा एक तास आगोदर पुर्ण करत इतिहास रचला होता. तसेच दरवर्षी गडकिल्ल्यांवर सायकल वर जात आसतात. आता ते पर्यावरण रक्षणाचा व इंधन बचतीचा संदेश देणार आहेत.
दररोज सोशल मिडीयावर किती प्रवास केला कोठे आहेत हा संदेश देतात त्यांना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा मिळत आहेत.
यावेळी जामखेड न्युजशी बोलताना डॉ. पांडुरंग सानप म्हणाले की, आपणास सांगण्यास फार आनंद होत आहे की आम्ही ऐतिहासिक सायकल प्रवास काश्मीर ते कन्याकुमारी आज यशस्वी रित्या पूर्ण केला आहे, प्रवास दि.18 मार्च 2021 रोजी सकाळी 7 वा.श्रीनगर (लाल चौक)येथून चालू केला ,व आज दि.3 एप्रिल 2021 रोजी कन्याकुमारी येथे सकाळी 6 वा.पूर्ण झाला, हा प्रवास 10 राज्यातून केला, तो 3800 किमी चा आहे, या साठी तब्बल 17 दिवस लागले, या मध्ये आपणा सर्वांच्या आशीर्वादाने हे मी पूर्ण केले या जगात कोणतीही गोष्ट शक्य आहे, ANYTHING IS POSSIBLE , ध्येय समोर ठेवा ते नक्कीच पूर्ण होणार.