जामखेड न्युज——
मीही दहा वर्षांपासून भगवान टोळीचा शिकार -संदीप शिंदे
राजकीय वलयामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ
डॉ. भगवान मुरूमकर यांच्या टोळीने मला गेल्या दहा वर्षांपासून सतत मारहाण करत खंडणीची मागणी केलेली आहे. मी दहा वर्षांपासून या टोळीचा शिकार होतो. त्यांच्या राजकीय वलयामुळे पोलीसही गुन्हा दाखल करून घेत नव्हते. त्यांच्या विरोधात अंदुरे कुटुंबीयांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे ज्या कोणाला या टोळीपासून त्रास झाला आहे त्यांनी समोर यावे असे आवाहन संदीप शिंदे आखील भारतीय चित्रपट महामंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य यांनी पत्रकार परिषदेत केले.
दहा दिवसांपूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्या सह आठ जणांविरोधात अंदुरे यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर सावळेश्वर उद्योग समूहाचे रमेश आजबे यांनी पत्रकार परिषद घेत भगवान मुरूमकर यांच्या टोळीच्या त्रासाचा उल्लेख केला होता. आज संदीप शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत टोळीच्या त्रासाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आणखी कोणा कोणाला त्रास झाला आहे हे लोक पुढे येत आहेत.
आज आखील भारतीय चित्रपट महामंडळ महाराष्ट्र राज्य सदस्य संदीप शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मी दहा वर्षांपासून या टोळीचा शिकार आहे मला वारंवार खंडणीची मागणी करत त्रास दिला आहे असे सांगितले.
तसेच व्यापारी बांधवांना विनंती केली की, ज्यांना ज्यांना यांच्या पासून त्रास झाला आहे त्यांनी पुढे यावे व अंदुरे कुटुंबीयांना साथ द्यावी.
शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, डॉ. भगवान मुरूमकर यांचे सहकारी त्यांच्या २०००नंबरच्या टाटा सफारी गाडीतून माझ्या कडे येत मला गाडीत टाकून पंचायत समिती मध्ये घेऊन जात असत व खंडणीची मागणी करत असत. यावेळी डॉ. भगवान मुरूमकर मला म्हणत असत तु दहा लाख रुपये दिल्याशिवाय सुट्टी नाही तु जर पैसे दिले नाहीस तर तुला तुझ्या जागेत पाय ठेऊ देणार नाही. असे भगवान मुरूमकर व त्याचे साथीदार यांनी वारंवार त्रास दिला
तसेच अंदुरे कुटुंबीयांना मारहाण होऊनही चार दिवस आरोपी दुकानापुढे येऊन दिवस दिवस बसत होते त्यावेळी पोलीस काय करत होते असा सवालही उपस्थित केला.
शहरातील ज्यांना या टोळीचा त्रास झालेला आहे त्यांनी पुढे यावे व अंदुरे कुटुंबीयांना साथ द्यावी असे आवाहन केले.