राज्य थांगता स्पर्धेत नगर जिल्हा संघाला 2 सुवर्ण, 3 रौप्य व 5 कांस्यपदक
जामखेडच्या कु.कोमल डोकडे व जय जाधव यांची राष्ट्रीय थांगता स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर येथे नुकत्याच राज्यस्तरीय थांगता अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये अ.नगर जिल्हा संघाला 2 सुवर्ण ,3 रौप्य व 5 कांस्यपदके मिळाली.
या स्पर्धेमधून कु.कोमल डोकडे व जय जाधव या खेळाडूची कन्याकुमारी येथे होणाऱ्या राष्ट्रीय थांगता स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या सर्व खेळाडूंना नगर जिल्हा थांगता संघटनेचे सचिव लक्ष्मण उदमले व उपाध्यक्ष शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या सर्व खेळाडूंचे ऑल महाराष्ट्र थांगता संघटनेचे सचिव महावीर धुळधर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर राळेभात,उमेश देशमुख, मा. प्राचार्य सुनील नरके, प्रा.आण्णा मोहिते यांनी हार्दिक अभिनंदन केले व राष्ट्रीय थांगता स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.