अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे जामखेड तालुक्यात पंचनामे पुर्ण, नुकसानीपोटी २२ कोटी रुपयांची मागणी
जामखेड तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. सदर पिकांच्या तसेच काही ठिकाणी अंशतः घर पडझड झालेल्या ठिकाणी पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जात आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांनी पाहणी केली होती प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते तसेच पिक नुकसान पाहणीसाठी माननीय महसूल मंत्री व पालकमंत्री अहमदनगर यांनी जामखेड मधील खर्डा आणि परिसरात दिनांक २४/१०/२०२२ रोजी पाहणी दौरा केला होता.
त्यअनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सुचानाप्रमाणे प्रत्येक गावात स्थानिक पातळीवरील कर्मचारी तलाठी,ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या सहाय्याने पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. जामखेड तालुक्यातील ८७ महसूल गावामध्ये पंचनामे करण्याबाबत आदेश करण्यात आलेले होते .सर्व स्थानिक पातळीवरील कर्मचारी यांनी ऐन दिवाळीच्या काळातही उपस्थित राहून पंचनामे पूर्ण करून पंचनामा अहवाल सादर केला आहे.
वरील सर्व अहवाल एकत्रित केल्यानंतर जामखेड तालुक्यात एकूण ८७ महसूल गावामध्ये एकूण २३६५६ शेतकरी यांचे १३९९५ हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे. तसेच एकूण ११ कच्च्या घरांची अंशतः पडझड झालेली आहे. पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडे २२ कोटी रुपये अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे. पिकांच्या नुकासानिमध्ये जिरायत पिकांचे १९५२७ शेतकरी यांचे ११९९० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. यात प्रामुख्याने सोयबीन, उडीद ,मुग पिकांचा समावेश आहे.
बागायत आणि हंगामी बागायत पिकांमध्ये एकूण ४१२९ शेतकरी यांचे २००५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने मका, तूर, मिरची, वांगे, कांदा, टोमाटो या पिकांचा समावेश आहे. त्यामुळे वरील सर्व पिकांच्या नुकसान भरपाई पोटी शासनाकडे जिरायत पिकांसाठी १६.३१ कोटी, बागायत पिकांसाठी ५.४१ कोटी , असे एकूण २२ कोटी रुपयाच्या शासकीय अनुदानाची मागणी केलेली आहे. शासन निर्णयाप्रमाणे जिरायत पिकांसाठी प्रती हेक्टरी १३६०० रुपये ,बागायत पिकांसाठी २७००० रुपये आणि फळ पिकांसाठी ३६००० रुपये अशी अनुदान वाढ करण्यात आलेली आहे. त्यानुसार अनुदानाची रक्कम प्राप्त झाल्यावर तात्काळ शेतकरी यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. अशी माहिती जामखेड न्यूजशी बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
अंशतः पडझड झालेल्या ११ घरांसाठी नवीन निकषप्रमाणे १.६५ लाख एवढे अनुदान मागणी करण्यात आलेली आहे . तसेच या कालवधीत शेतात काम करणाऱ्या १ जनावारांचा (बैल) वीज पडून मृत्यू झाल्याने त्यासाठी ३०००० रुपये अनुदान मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात झालेले पिक नुकसानी खालीलप्रमाणे आहे. सोयाबीन ८२६३ हेक्टर,
अनावधानाने कुणाचे पंचनामा करण्याचा राहून गेला असेल तर अशा शेतकरी यांनी आपल्या शेताचा फोटो आणी अर्ज तहसील कार्यालयात जमा करावा तो पंचनामा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अनुदान वाटप करणेकामी शेतकरी यांनी आपले बँक खाते नंबर तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांचेकडेस जमा करावे असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी प्रशासनामार्फत केले आहे.