युपी येथे झालेल्या ग्रँड फिक्स नॅशनल कुस्ती स्पर्धेत पै.सुजय तनपुरेनी मिळवले सुवर्णपदक जामखेडचा मल्ल खेळणार आंतरराष्ट्रीय स्तरावर

0
206

 

जामखेड न्युज—-

युपी येथे झालेल्या ग्रँड फिक्स नॅशनल कुस्ती स्पर्धेत
पै.सुजय तनपुरेनी मिळवले सुवर्णपदक

आता जामखेडचा मल्ल खेळणार आंतरराष्ट्रीय स्तरावर

युपी गोंडा येथे झालेल्या ग्रँड फिक्स नॅशनल कुस्ती स्पर्धेत मामासाहेब मोहोळ तालमीचा मल्ल पै.सुजय तनपुरे यांनी (68KG Freestyle) गटात सुवर्णपदक मिळवले आहे आगोदरही हरियाणा येथे झालेल्या नॅशनल कुस्ती स्पर्धेत फ्री टाईल गटात सुवर्णपदक मिळवले होते. पहिली कुस्ती दिल्लीच्या सचिन सोबत 10-0 अशा गुणाने जिंकली, दुसरी कुस्ती sscb च्या विशेष खार सोबत 10-0 अशी झाली, तिसरी कुस्ती सेमी फायनल ही दिल्ली च्या निशांत रोहील बरोबर 5-2 अश्या गुणाने झाली व फायनल कुस्ती ही हरियाणाच्या यश सोबत 10-0 अशा गुणाने होत राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे. यामुळे त्याच्या वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळणार आहे. 

हरियाणा येथील कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल आमदार रोहित पवार व आमदार प्रा राम शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला होता. तसेच नगरसेवक मोहन पवार यांनी त्याची आमदार रोहित पवारांसमवेत पै. सुजय तनपुरेची बैलगाडीतून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली होती.

माजी नगरसेवक मोहन पवार, मातोश्री क्रीडा संकुल व लाल आखाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने महावीर भवन येथे आ. रोहित पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य नागरी सत्कार, गुणवंत खेळाडूंचा सन्मान व गणेश मंडळ बक्षिस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता तत्पूर्वी पै. संजय तनपुरे याने नॅशनल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तपनेश्वर रोड, खर्डा चौक, नगर रोड येथून बैलगाडीमधून मिरवणूक
काढण्यात आली होती. तसेच आमदार रोहित पवारांनी सांगितले होते की. जामखेडला आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारणार तसेच पै. सुजय तनपुरेचा काँमनवेल्थ स्पर्धेपर्यंत सर्व खर्च करणार असे सांगितले होते.

हरियाणा येथील कुस्ती स्पर्धेत पैलवान सुजय ने पहिल्या कुस्तीमध्ये पंजाबच्या दिपक सिंग या मल्ला वरती 10-0 असा विजय मिळवला. नंतर उप उपांत्य फायनलच्या कुस्तीमध्ये उत्तर प्रदेशच्या विकेश यादव यावरती 9-2 सा विजय मिळवून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला, सेमी फायनल मध्ये दिल्लीच्या निशांत रोहील वरती 3-1 असा विजय मिळवला व फायनल मध्ये प्रवेश केला, फायनल कुस्ती मध्ये हरियाणाच्या यश सोबत चिटपटीने विजय मिळवत महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले.

आताही युपी गोंडा येथे झालेल्या ग्रँड फिक्स नॅशनल कुस्ती स्पर्धेत मामासाहेब मोहोळ तालमीचा मल्ल पै.सुजय तनपुरे यांनी (68KG Freestyle) गटात सुवर्णपदक मिळवले आहे. 

पैलवान सूजय ची थोडक्यात पार्श्वभूमी म्हणजे वडील नागनाथ तनपुरे यांचे गावामधे एक छोटे हॉटेल आहे पण त्यांची मुलांना पैलवान करायची इच्छा त्यांनी मोठा मुलगा विकास आणि त्यानंतर सुजय याच्या माध्यमातून पूर्ण झाली,सामान्य घरामधून सुजयचा प्रवास सुरू झाला गावामधील छोट्याशा भैरवनाथ तालीम मध्ये वस्ताद विठ्ठल देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू झाला त्याच्यासोबत गावातील आणखीही पैलवान पोर आहेत सर्वांनी खूप जिद्दीने सराव केला,सगळेच पुढं नाही जाऊ शकले पण सुजय आणि सौरभ गाडे, यशवंत गाडे, शुभम लटके यांनी पुणे मध्ये मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल येथे कुस्तीचे धडे घेतले.

तेथे त्यांना वस्ताद पंकज भाऊ हरपुडे वस्ताद महेश मोहोळ व अमित जाधव वस्ताद यांनी मार्गदर्शन केले आणि आज सुजय ने गोल्ड मेडल मिळवले आहे,सुजय चे कौतुक पूर्ण गावाला आहे त्याच्या सहकाऱ्यांना यासाठी आहे की कुठेही कुस्ती करताना वीज लकलकावी अश्या पद्धतीने समोरच्या पैलवानाला सुजय चितपट करतो आणि विजयी होतो.

सुजय वर सर्व स्थरा मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे, जामखेडचे माजी सरपंच तसेच शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने सर, माजी सरपंच सोमनाथ तनपुरे ,मार्केटचे सभापती गौतम उतेकर,सरपंच हनुमंत उतेकर, उपसरपंच विठ्ठल देवकाते, सोसायटी चेरमन माऊली कडू यांसह गावातील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here