खर्डा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या दिपावली विशेषांकांचे उत्स्फूर्त स्वागत, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते अनावरण

0
164

जामखेड न्युज——

खर्डा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या दिपावली विशेषांकांचे उत्स्फूर्त स्वागत, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते अनावरण

खर्डा भागातील पर्यटन दृष्ट्या विविध प्रेक्षणीय स्थळांच्या माहितीसह अनेक विषय व महत्त्वपूर्ण बातम्यांनी नटलेल्या पोलीस वारंट दिपावली विशेषांकांचे अनावरण जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

जामखेड पोलीस स्टेशन येथे झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाच्यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी सुनील बडे सहाय्यक पोलीस निरीक्षक, ठाणे अंमलदार, नगर व्हिजन न्युज नेटवर्कचे संपादक संजय वारभोग, सार्वमतचे पत्रकार समीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस वारंटच्या विविध विशेषांतून नेहमीच विविध अशा सामाजिक व समाजाच्या विविध विषयांचा आढावा व मार्गदर्शनपर विषय असतात.

या दिपावली विशेषांकात खर्डा पर्यटन क्षेत्राचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी विशेष लेखांक, खर्डा परिसरातील अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असणारे भाजपाचे नेते रविदादा सुरवसे, भारतीय सैन्याकडून गौरविण्यात आलेले उदय बारवकर यांचा गौरवलेख सह महत्त्वाच्या घटनंचा आढावा घेणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

खर्डा येथून प्रकाशित होणाऱ्या या व राज्यातील सर्व जिल्हात वितरित होणाऱ्या पोलीस वारंट च्या दिपावली विशेषांकांचे सर्व स्तरातून उत्स्फूर्त स्वागत झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here