जामखेड न्युज——
देवदैठण येथे दिवसा घरफोडी रोख रक्कमेसह सोन्याचा ऐवज लंपास
घरफोड्याचे प्रमाण वाढले

जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील देवदैठण येथील जामखेड रोडवरील आजीनाथ गेनदेव भोरे (वय ५०) यांच्या राहत्या घराचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरटयाने कशाने तरी तोडुन घरामध्ये प्रवेश करून घरामधील कपाटाची व सामानाची उचकापाचक करून रोख रक्कमेसह सोने असा ७५ हजाराचा ऐवज जवळपास लंपास करत अज्ञात चोरटे लंपास झाले.खर्डा पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आजीनाथ भोरे यांच्या घरातील कपाटामध्ये ठेवलेले ५० हजारांच्या रूपयांच्या रोख रक्कमेसह २३००० रूपये किंमतीची एक सोन्याची बोरमाळ, कानातील फुले, नथ, व दोन ओम असे अंदाजे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ७३,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा ऐवज दिवसा घरफोडी करून लबाडीचे इराद्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.

यानुसार फिर्यादी आजीनाथ गेनदेव भोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याच्या विरोधात भा.द.वि. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना आज दि. २९ आँक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान म्हणजे दिवसा ढवळ्या घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस नाईक संभाजी शेंडे, शशिकांत म्हस्के यांच्या टिमने भेट दिली या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्टेबल आर.के. सय्यद हे करत आहेत.
चौकट
सध्या शेतात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत त्यांमुळे दिवाळी असुनही ग्रामीण भागातील लोक शेतातील सोयाबीन काढणीसाठी तसेच अतिरिक्त पावसामुळे वाढलेले तण काढण्यासाठी घर बंद करून जातात याच संधीचा फायदा चोरटे घेत आहेत. तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत.





