जामखेड न्युज——
मुख्याधिकारी यांच्या कामगार विरोधी धोरणांबाबत
हायकोर्टात दावा दाखल करणार -अँड. डॉ. अरूण जाधव
दिपावली पुर्वी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा पगार करावा म्हणून १९ तारखेला निवेदन दिले होते पण कर्मचाऱ्यांचा पगार न करता मुख्याधिकारी यांनी मलाच लेखी दिले आहे व मीच कामगार लोकांमध्ये असंतोष निर्माण करतो असे म्हटले आहे. मी गरीबांसाठी व कामगारांसाठी जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे काहीही झाले तरी मी कामगारांसोबत आहे. मुख्याधिकारी यांच्या पत्रा विरोधात मी जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार केली आहे व आता हायकोर्टात दावा दाखल करणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते व नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अँड. डॉ. अरूण जाधव यांनी दिली.
अँड अरूण जाधव यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते हे नेहमीच कामगारांना मानसिक त्रास देतात अपमानित करतात गेल्या एक वर्षापासून कधीही पगार वेळेवर करत नाहीत सतत थकित असतो. मी नेहमी कामगारांसोबत आहे म्हणून माझ्यावर अधिकाऱ्यांचा रोष आहे. मी गरीबांसाठी व कामगारांसाठी जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे काहीही झाले तरी मी कामगारांसोबत आहे. मुख्याधिकारी यांच्या पत्रा विरोधात मी जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार केली आहे व आता हायकोर्टात दावा दाखल करणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते व नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अँड. डॉ. अरूण जाधव यांनी दिली
पत्रात म्हटले आहे की, संदर्भीय अनुपात नमूद केलेले मुद्दे नुसार आपणास कळविण्यात येते की, निधी उपलब्ध नसल्याने माहे ऑक्टोबर २०२२ या महिन्याचे वेतन देता येणे शक्य नाही ७ व्या वेतन आयोगातील थकीत रक्कम उपलब्ध निधीनुसार अदा करण्यात येतील. तसेच अन्य मुद्दे प्रशासकीय स्तरावरील असून या बाबत प्रशासकीय स्तरावरती कार्यवाही करण्यात येते. कर्मचा-यांना आशा प्रकारे काही हरकती असल्यास त्यांनी नगरपरिषदेच्या वरिष्ठ प्राधिकरणाकडे अपिल करण्याची तरतूद नियमात आहे आपले मार्फत नगपरिषदेच्या प्रकरणात या पूर्वी कोणताही या बाबत पत्रव्यवहार केलेला नसून सनासुदीच्या पार्श्वभूमीवर असंतोष निर्माण होईल असे कृत्य करणे हि बाब योग्य नाही. कर्मचा-याचे अडचणी बाबत कर्मचा-यानी मुख्याधिकारी प्रशासकीय अधिकारी यांचेकडे संपर्क करणे बाबत कर्मचा-यांना अवगत करावे. त्या बाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
तरी दिनांक २४/१०/२०२२ रोजी अहमदनगर जिलधिकारी कार्यालया समोर कर्मचा-यासह कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये असे सांगितले होते.
अर्जदार हे नगरपरिषदेच्या सबंधित विषया बाबत / मुद्दान बाबत प्रशासकीय स्तरावर कधीही संपर्क करत नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. न.प.चे विविध विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचा-या मार्फत नागरिकांना सुविधा पुरविणे, शासकीय योजना राबविणे व वेळोवेळी वरिष्ठांकडून प्राप्त निर्देशानुसार कामकाज केले जाते. नगरपरिषदेशी आर्थिक उत्पन्नाची साधने मर्यादित असून त्यानुसार वेतन, नागरी सुविधा पुरविणे बाबत कार्यवाही केली जाते. अर्जदारांना आंदोलनाचा पवित्रा घेणेपूर्वी न. प. प्रशासनाशी संपर्क, चर्चा करणे बाबत आपले स्तरावरुन निर्देश देणे आवश्यक आहे असे मत आहे. २) प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत ३) पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जामखेड यांना कळविण्यात आले आहे.
मी कामगारांसोबत आहे म्हणून मुख्याधिकारी हे मला टार्गेट करत आहेत काहीही झाले तरी
मी गरीबांसाठी व कामगारांसाठी जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे काहीही झाले तरी मी कामगारांसोबत आहे. मुख्याधिकारी यांच्या पत्रा विरोधात मी जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार केली आहे व आता हायकोर्टात दावा दाखल करणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते व नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अँड. डॉ. अरूण जाधव यांनी दिली