तालुक्यातील पिंपरखेड येथे दिवसाढवळ्या चोरी सोन्याच्या ऐवजासह रोख रक्कम लंपास

0
149

जामखेड न्युज——

तालुक्यातील पिंपरखेड येथे दिवसाढवळ्या चोरी
सोन्याच्या ऐवजासह रोख रक्कम लंपास

जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकरी आण्णासाहेब पाडुरंग शिंदे (वय ५३) यांचे घरात दिवसा ढवळ्या चोरी, सोन्या-चांदीच्या दागीन्यासह एकूण ६७, ५००रूपयांचा मुद्देमालावर चोरट्याने मारला डल्ला असून याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की यातील फिर्यादी व त्यांच्या पत्नी दैवशाला असे आम्ही दि. २७ आँक्टोबर रोजी सकाळी २: ०० वाजताचे सुमारास आमचे पिपळखेड गावचे शिवारात घराजवळील शेतात लिंबु काढण्यासाठी गेलो होतो. दुपारी ३: ३० वाजताचे सुमारास माझी पत्नी लिंबू काढुन घराकडे गेली.

त्यानंतर ५ मिनीटाने मला माझी पत्नी देवशाला हिने आवाज देऊन घरी बोलावून घेतले. यानुसार घरी जावुन पाहीले असता. घराचे दोन्ही दरवाज्याचे कोडे कशाने तोडुन कूलूपे खाली पडलेले व दरवाजा उघडा असल्याचे दिसले मी घरामध्ये जावुन पाहीले असता घरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसली.

त्यानंतर मी कापटाजवळील टेबलचे ड्राव्हर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने ज्यामध्ये ५ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ १२५०० रूपये किंमतीचे, ७ ग्रॅम वजनाचे १३५०० किंमतीचे सोन्याचे गंठण, चार चार ग्राम वजनाच्या २०,००० दोन सोन्याच्या अंगठ्या, ३ ग्रॅम वजनाचे ७५०० किमतीचे कानातील सोन्याचे झुबे, व रोख रक्कम १३,००० रूपये असा एकूण ६७, ५००रूपयांचा मुद्देमाल ड्राव्हर मध्ये दिसला नाही. म्हणुन पत्नी मोठ्याने रडु लागली. पत्नी दैवशला हिचा रडण्याचा आवाज तेव्हा आमची खात्री झाली कि आमचे घरातील कपाटा शेजारी असलेले लोखडी टेबलचे ड्राव्हर मधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लबाडीच्या इराद्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन नेली आहे.

यानुसार फिर्याद आण्णासाहेब पाडुरंग शिंदे (वय ५३) धंदा शेती, रा-पिंपळखेड ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ४५४, ३८० नुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, सहाय्यक फौजदार शिवाजी बोस आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळास भेट दिली.

या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here