जामखेड न्युज——
सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुणीजन साधकांचा जामखेड भक्ती शक्ती महोत्सव समितीच्या वतीने पुजन सोहळा
हभप उत्तम महाराज वराट यांचे किर्तन!!!
अमित शेठ चिंतामणी, दत्तात्रय सोले पाटील, गोरख घनवट, प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र राळेभात,
ओंकार झेंडे, हरिदास आबा गुंड, बाबा महाराज मुरूमकर, अशोक महाराज राळेभात, भाऊसाहेब महाराज कोल्हे, श्री ह भ प कैलास महाराज भोरे देवदैठण, श्री ह भ प उत्तम महाराज वराट साकत
श्री ह भ प सोपान काका महाराज निगुडे आरंगाव
श्री ह भ प कृष्णा महाराज उगले नायगाव
श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज नगरे खर्डा
श्री ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज कोल्हे कोल्हेवाडी
श्री ह भ प नवनाथ महाराज जाधव दंडाची वाडी
श्री ह भ प उद्धव महाराज पवळ डोणगाव
श्री ह भ प दत्ता महाराज खवळे सारोळा
श्री ह भ प नामदेव महाराज राऊत सटवाई जवळके
श्री ह भ प विजय महाराज चिंचपूरकर
श्री ह भ प सुनील महाराज मस्के आरंगाव
श्री ह भ प भागवत महाराज दळवी साकत
श्री ह भ प पांडुरंग महाराज कोल्हे कोल्हेवाडी साकत
यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वानंद सुकनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेली सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या संस्थेला जवळजवळ 106 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत या संस्थेने महाराष्ट्राला अनेक कीर्तनकार गुरुजन गायक वादक वारकरी विचारधारा जिवंत ठेवणारे प्रचारक तत्त्ववेत्ते दिले आहेत या संस्थेचा इतिहास असा आहे विद्यार्थ्याला फी नाही शिक्षकाला पगार नाही अशी अव्यहातपणे 106 वर्ष ही संस्था काम करत आहेत.
या संस्थेने समाज घडवण्यासाठी अनेक हिरे जन्माला घातले समाजाच्या हितासाठी दिले कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने अनेक विभूती होऊन गेल्या त्यांनी खूप मोठे समाज प्रबोधनाचा कार्य केलं व संत पदाला पोहोचले त्याचं कारण सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था याच संस्थेत आपल्या तालुक्यातील श्री ह भ प कैलास महाराज भोरे, श्री उत्तम महाराज वराट, श्री भागवत महाराज दळवी ही मंडळीसह मोठ्या प्रमाणावर गुणीजन साधक तयार होऊन समाजप्रबोधनाचा काम निरपेक्ष भावनेने करत आहेत.
आजही संस्थेमध्ये आपल्या तालुक्यातील खूप मंडळी नाहीत परंतु जे आहेत त्यांचा सन्मान व्हावं त्यांचं पूजन व्हावं ही मानसिकता आहे म्हणून 26 10 2022 रोजी संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये विठ्ठल भजनी मंडळ भक्ती शक्ती महोत्सव समिती व जामखेड शहरवासी यांच्या वतीने आजी-माजी साधकांचा साधक पूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना हभप कैलास महाराज भोरे म्हणाले की, आमचा हा सन्मान ज्यांनी या महान कार्यात आहुती दिलेली आहे अशा महान विभूती सदगुरू जोग महाराज आमच्या गुरूचनांच्या चरणी अर्पण करतो. सर्व साधकांनी जोग महाराज यांच्या नावाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊ.
यावेळी बोलताना भक्ती शक्ती महोत्सव समितीचे अमित चिंतामणी म्हणाले की, हभप दिपक महाराज भक्ती शक्ती महोत्सव समितीच्या माध्यमातून वेळोवेळी नवनवीन उपक्रम राबवितात. सातत्याने मार्गदर्शन करतात यामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून शहरात कीर्तन महोत्सव राबवत आहोत. सर्व संत मंडळी आमच्या विनंतीला मान देऊन आले त्यामुळे सर्वाचे आभार मानले.
यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, समाज घडविण्यासाठी संतांचे विचार महत्त्वाचे आहेत. हे विचार समाजापर्यंत पोहचविण्यासाठी ही मंडळी काम करत आहेत. अनेक लोक डॉक्टर होण्यासाठी आपल्या पाल्यांना लातूरला ठेवतात तसे महाराष्ट्रात अनेक गुणीजन महाराज सदगुरू जोग महाराज शिक्षण संस्थेत घडले आहेत.
ओंकार झेंडे यांनीही शुभेच्छा दिल्या.