जामखेड न्युज——
तीन दिवसात शंभर टक्के पंचनामे करणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्यासाठी पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर -आमदार प्रा. राम शिंदे
तीन दिवसात सर्व नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच विमा कंपन्यांना नुकसानीच्या सूचना देण्याची ७२ तासाची अट शिथिल करू तसेच शेतकऱ्यांना मदतीसाठी काही शासनाच्या अटी विमा कंपनी वर लादू असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात आज सोमवार दि. २४ रोजी महसूल, दुग्ध विकास व पशुसंवर्धन तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी खर्डा परिसरातील तेलंगशी, मोहरी, जायभायवाडी येथील नुकसाग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, हभप महालिंग नगरे,
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा कृषी अधिकारी जगताप साहेब, प्रातांधिकारी अजित थोरबोले,तहसीलदार कर्जत नानासाहेब आगळे, जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, कर्जतचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, कर्जतचे दिपक सुपेकर मनोज भोसेकर, साहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै. शरद कार्ले, सोमनाथ पाचरणे, लहु शिंदे, रवी सुरवसे, प्रा. अरूण वराट, साकतचे चेअरमन कैलास वराट, करण ढवळे,महारुद्र महारनवर, गणेश लटके, बाजीराव गोपाळघरे, वैजीनाथ पाटील, जयराम खोत, चत्रभुज बोलभट, अँड बंकट बारवकर, मकरंद काशीद, महादेव वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या आढावा बैठकीमध्ये माझी मंत्री आ प्रा राम शिंदे यांनी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना म्हटले की सरसकट पंचनामे करून सूचना प्रशासनात द्याव्यात, रब्बीतील ज्वारी पेरणी होणार नसून शेती नापेर राहणार आहे त्याची पडताळणी करावी, लवकरच पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन मदत शेतकऱ्यांना द्यावी शेतकऱ्या संदर्भात काही प्रश्न पालकमंत्री यांच्यापुढे आढाव बैठकीत मांडले.शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्यासाठी पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर आले म्हणून त्यांचे आभार आमदार प्रा. राम शिंदे यांनी मानले.
यावेळी आढावा बैठकीमध्ये उत्तर देताना महसूलमंत्री, दुग्ध व मत्स्यसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की ऑनलाईन पीक विम्यासाठी नोंदणी करताना अडचणीत असल्याने ऑफलाईन पंचनामे करण्याचे सूचना करण्यात आल्या, शेतकऱ्यांचा खाजगी विमा कंपन्या वर रोष आहे शेतकऱ्यांकडून पिक विमा साठी काही रक्कम भारत सरकार व राज्य सरकार भागीदारी करून भरत असते त्या पटीत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. ६५ मिली मीटर पावसाचे अट असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीच्या फायदा मिळत नाही, त्या विषयावर त्या नियमात काय त्रुटी राहिल्या आहेत त्या शिथिल करण्याचा प्रयत्न चालू आहे.
खाजगी विमा कंपनीचे ७२ तासाच्या आत विमा कंपनीचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कळवणे बंधनकारक ही आठ शिथिल करण्याची गरज आहे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे हा निर्णय बदलण्याचा प्रयत्न कृषी मंत्र्यांशी चर्चा करून रद्द करण्यासाठी प्रयत्न करू,
सरकार शेतकऱ्यांचे आहे पैसा शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांना अटी घालून चालला नाही त्यासाठी विमा कंपन्यांना शासनाच्या काही शेतकरी हिताच्या अटी घालून शेतकऱ्यांना नुकसान ग्रस्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार.
जामखेड तालुक्यात पंचनामाचा घोषवारा वाचताना जामखेड तालुका हे 30 टक्के पेक्षा जास्त नुकसान प्राथमिक अहवाल यावेळी त्यांनी वाचून दाखविला. १५२६९ हेक्टर क्षेत्र बाधित आहे, २५६८५ शेतकऱ्यांची संख्या आहे. पंचनामे झालेले क्षेत्र ९७७८.९५ हेक्टर, त्यात १६२४२ शेतकरी आहेत. शिल्लक पंचनामे ५४९०.०५ हे सरक्षित क्षेत्र असून शेतकऱ्यांची संख्या ९४४३ आहे .यावर्षी एचडीएफसी कंपनीचे 33 हजार आटशे हेक्टर, मागील वर्षी वीस हजार शेतकऱ्यांनी १२१७ हेक्टर सुरक्षित होते. ३८ हजार कोटी विमा होता. तर यावर्षी एचडीएफसी कंपनी शेतकऱ्या ंची तीस हजार हेक्टर विमा भरलेला असून १६०५६ हेक्टर हेक्टर साठी ४८ कोटी संरक्षित रक्कम आहे.
सरसकट पंचमी करून सर्वांना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे व सर्व शेतकरी शासकीय मध्ये बसून वंचित राहता कामा नये अशा सूचना आढावा बैठकीत देण्यात आल्या. शेतकऱ्यांचा वीज प्रश्न लवकरच सुटून, मागेल त्याला शेततळे देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्नशील राहू असेही सांगितले