जामखेडमध्ये तरुणांची हत्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

0
323

 

जामखेड न्युज——

जामखेडमध्ये तरुणांची हत्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

जामखेड शहरापासून जवळच असलेल्या साकत फाटा येथील काँटन मील जवळ गणेश शिवाजी वारे वय ३० या तरुणाची कोणीतरी अज्ञातांनी २३ च्या रात्री टनक हत्याराने मारहाण करून हत्या केली ही घटना आज २४ रोजी सकाळी उघडकीस आली.

साकत फाटा येथील लाँर्ड महावीर खाजगी शाळेजवळ असलेल्या काँटन मील जवळ एका तरूणांचा मृतदेह असल्याची माहिती जामखेड पोलीसांना मिळाली यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयताच्या पोटावर, छातीवर, पाठीवर, डोक्यावर, हातावर व पायावर टनक हत्याराने मारहाण करून जीवे मारले असे दिसत होते.

तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला डॉ. कुंडलीक औचरे यांनी शवविच्छेदन केले.

मयतचे वडील शिवाजी मारूती वारे वय ५२ संगम जळगाव गेवराई जि. बीड यांनी फिर्याद दाखल केली आहे. जामखेड पोलीसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मयत गणेश वारे हा गेल्या पाच वर्षापासून घरातून बाहेर पडलेला होता कोणतेही बिगारी काम करत होता तसेच तो व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यामुळे अनेक वेळा पाटोदा किंवा जामखेड परिसरात तो लहान मोठ्या चोरी पण करत असे. व्यसनामुळेच कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी मारले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती कळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातखडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली या घटनेचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे करत आहेत.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here