जामखेड न्युज——
संकल्प महिला ग्रामसंघाच्या वतीने गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना किराणा किटचे वाटप

जामखेड पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटाविकास अधिकारी प्रकाश पोळ साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त परिसरातील गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले यामुळे गरजूंची दिवाळी गोड झाली आहे.

माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले यामुळे गरजूंची दिवाळी गोड झाली आहे.

नान्नज येथील संकल्प ग्रामसंघाच्या माध्यमातुन गरीब व गरजु कुटुंबातील बचत गटातील महिलांच्या कुंटुबासाठी दिपावली सणा निमीत्त मोफत किराणा सामान व अत्यावश्यक चीज वस्तुचे वाटप करण्यात आले

तसेच संकल्प महिला ग्रामसंघाच्या वतीने त्यांना दिपावलोच्या शुभेच्छा देऊन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला.

याप्रसंगी ग्रामसंघाच्या सामाजिक समितीच्या अध्यक्ष सुनीता ताई भवळ, कृषी सखी, दर्शना ताई साळवे व मनीषा ताई मोहलकर उपस्थित होत्या.



