तालुक्यातील दिघोळ येथे वीज पडल्याने तरूण गंभीर जखमी मोबाईल जळून खाक

0
297

जामखेड न्युज——

तालुक्यातील दिघोळ येथे वीज पडल्याने तरूण गंभीर जखमी
मोबाईल जळून खाक

तालुक्यातील दिघोळ येथे आई वडिलांबरोबर शेतात काम करत असताना अचानक पाऊस सुरू झाला सगळेजण निवाऱ्याला थांबले होते तेव्हा विकास राजेंद्र आटकरे वय १८ चिंचेच्या झाडाखाली बसलेला असताना अचानक वीज झाडावर पडली यात तो गंभीर जखमी झाला असून खिशातील मोबाईल जळून खाक झाला आहे. ताबडतोब विकास यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

आज दि. २० रोजी दुपारी घाटमाथ्यावर दुपारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यामध्ये दिघोळ येथील शेतात काम करत असलेल्या विकास आटकरे उभा असलेल्या चिंचेच्या झाडावर वीज पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

विकास हा बारावीमध्ये शिकत आहे आजपासून शाळेला सुट्टी असल्याने तो आईवडिलांना मदत करण्यासाठी सोयाबीन काढण्याचे काम करत होता.
अचानक दुपारी विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू
झाला आणी अचानक वीज झाडावर पडली यात विकास गंभीर जखमी झाला त्यास ताबडतोब ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले. खिशातील मोबाईल जळून खाक झाला आहे.

विकास आटकरे यांच्या मानेला कंबरेला पाठीला पिंडरीला जखमा झाल्या आहेत. तर मोबाईल जळून खाक झाला आहे.

विकास यास सचिन आटकरे, महेश आटकरे, शिवाजी आटकरे, राजेंद्र आटकरे यांनी मदत केली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंडलीक अवसरे यांनी त्यावरून उपचार केले. 

चौकट

सध्या अवकाळी पाऊस पडत आहे कोणीही झाडाखाली बसू नये तसेच मोबाईल चा वापर करू नये असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here