यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, नंदकुमार गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते
विठ्ठलराव राऊत, भागवत करडकर, संजीवन मेंढकर, अशोक करडकर, सतिश पालकर, नितीन यादव, विशाल राऊत, आण्णासाहेब देशमुख, रोहिदास देशमुख, कचरू करडकर, दिगांबर सोनवणे, बाळासाहेब वाघ, प्रविण कुंभार, संजीवन कुंभार, रेवणनाथ कुंभार आदी कुंभार समाज बांधव उपस्थित होते
तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत बांधकामासाठी पन्नास पोते सिमेंट एक टृक खडी एक वाळू दहा पञे उपलब्ध करून दिले आहेत.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. अशा वेळी डॉ.आरोळे हॉस्पिटल मधील उभारण्यात आलेले कोवीड सेंटर मार्फत रुग्णांची व्यवस्था करण्यात येत आहे. डॉ. रवी आरोळे, डॉ.शोभा आरोळे व तेथील कर्मचारी रांञदिवस रूग्णांची सेवा करत आहेत. अशा परिस्थितीत कमी पडत असलेली मदत पाहता, ही बाब डॉ. रवी आरोळे यांनी २ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या लक्षात आणून दिली होती. यावेळी जिल्हाधिकारी यांनी येथे औषधे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तर हॉस्पिटलचे थकलेले ५० % लाईट बील आमदार रोहित पवार यांनी भरण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या २०० च्या वर रूग्ण उपचार घेत असून, नवीन हॉलमध्ये १०० रुग्णांची व्यवस्था होणार आहे. या सर्वांना सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या मदतीची गरज भासणार आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे. जामखेडकरांनी यापुर्वीही मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. तशीच मदत यापुढे करावी असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.