जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट )
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरला धान्य व भाजीपाला स्वरूपात मदत तसेच जामखेड शहरातील पुरातन अशा श्रीशैल्यममल्लिकार्जुन मंदिर परिसराची साफसफाई करून आवारात वृक्षारोपण करून शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांनी आपला वाढदिवस साजरा केला
80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या तत्त्वावर शिवसेना काम करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क प्रमुख संजय घाडी, सहसंपर्कप्रमुख डॉ.विजय पाटील व जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्या आदेशानुसार शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांनी आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला.

श्रीशैल्यममल्लिकार्जुन मंदिर परिसरात वृक्षारोपण व आरोळे कोविड सेंटरला गहू, तांदूळ व भाजीपाला देताना
आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ रवी आरोळे, सुलताना भाभी, जामखेड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद उपप्रमुख गणेश उगले, बावीचे सरपंच निलेश पवार, युवा सेना शहर प्रमुख सुरज काळे, शिवसेना शहर उपप्रमुख अवि (दादा) बेलेकर, जगदंब प्रतिष्ठान अध्यक्ष सागर गुंदेचा, गणेश तात्या राळेभात, कैलास आबा खेत्रे, करण ओझर्डे, आकाश मुळे, अंगद चव्हाण, आबा मोहोळकर, तुषार जगदाळे, एसटी डेपोचे बालाजी बने साहेब, विठ्ठल कुलथे, श्रीधर सिद्धेश्वर, अतुल पवार, किरण भुजबळ, भारत पवार, बालाजी बने, तुषार जगदाळे, गणेश राळेभात, आकाश निकम ग्रामपंचायत सदस्य शिऊर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात त्यांनी शहरातील प्रभाग 18 व 14 मध्ये पाणी टंचाईच्या काळात मोफत टॅंकरने पाणीपुरवठा, अनेक ठिकाणी मुरमीकरण करून रस्ते केले, गटारे केले, अनेक ठिकाणी लोकांना बसण्यासाठी बाकडे टाकले आहेत. तसेच लाईटचाही प्रश्न सोडविला आहे. शहरातील पुरातन मंदिर असलेल्या श्रीशैल्यममल्लिकार्जुन मंदिर परिसरात दगड मातीचे मोठ्या प्रमाणावर ढिगारे, काटेरी झुडपे होती काशिद यांनी जेसीबीच्या साहाय्याने सर्व साफसफाई केली व मंदिर परिसरात झाडे लावली व झाडांना पाणी घालण्यासाठी एक टॅकर तेथे ठेवला आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

तसेच कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरला गहू, तांदूळ व भाजीपाला देण्यात आला आहे यामुळे आरोळे कोविड सेंटरला मोठी मदत झाली आहे.
आरोळे कोविड सेंटर मध्ये सध्या 226 रूग्ण उपचार घेत आहेत यातील 51 रूग्ण आॅक्सिजन वर आहेत. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन आरोळे यांनी केले आहे.