जामखेड न्युज——
जामखेडच्या युवकाचा पुण्यामध्ये आगळावेगळा वाढदिवस
हळगाव तालुका जामखेड येथील आकाश आबासाहेब ढवळे हा युवक पुण्यामध्ये वकीलीचे शिक्षण घेत आहे. 12 ऑक्टोबर रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या दादाची शाळा या संस्थेच्या माध्यमातून आकुर्डी येथे मुलासोबत वाढदिवस साजरा केला.
शिक्षणापासून कोणतीही व्यक्ती अथवा समाज वंचित राहु नये यासाठी आकाश याचे नेहमीच प्रयत्न असतात.शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांनी हा कार्यक्रम घेतला.
कोणत्याही चुकीच्या पद्धतीने आणि पैश्याची उधळपट्टी न करता सामाजिक भान जपत आकाश याने या रस्त्यावर राहणाऱ्या पाथरिक मुलासोबत वाढदिवस करून त्यांना विविध वस्तूंचे वाटप केले. यामध्ये शैक्षणिक साहित्य, खाऊ, शाळेसाठी आवश्यक खुर्ची, गोष्टीची पुस्तके आणि ज्या शाळा झोपडपट्टी मध्ये आहेत त्या साठी ताडपत्री, ग्रीन नेट, चटई आणि फळा देऊन वाढदिवस केला.
दिवसाची सुरुवात ही रक्तदान करून केली. त्याचबरोबर निगडी येथील जवळपास १०० बेघर लोकांना जेवणाचे पार्सल वाटण्यात आले.
या वर्षीच्या दिवाळीमध्ये देखील या झोपडपट्टीवरील लोकांना फराळ आणि साहित्य वाटपाचा संकल्प आकाश ढवळे आणि त्यांचे सहकारी अनिकेत कुलकर्णी व स्वप्नील ढवळे यांनी केला आहे.