साकत परिसरातील सोयाबीन पीक पाण्यात पंचनामे करण्याची मागणी

0
181

जामखेड न्युज——

साकत परिसरातील सोयाबीन पीक पाण्यात पंचनामे करण्याची मागणी

तालुक्यातील घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादन होते. साकत परिसराला तर सोयाबीनचे कोठार म्हणतात. गेल्या आठ दिवसांपासून दररोज होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन पीक पाण्यात गेले आहे तसेच काढून ठेवलेल्या मुठी पाण्यात आहेत यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत.यंदा पेरणीनंतर सततच पाऊस आहे पीक जोमदार आले पण काढणीस आलेले पीक पाऊस काढू देत नाही. दररोजच पाऊस येत आहे यामुळे पीक पाण्यात आहे. काढून ठेवलेल्या मुठी भोवती तळे साचले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे पीक पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून त्याची गंजी शेतात लावून ठेवली होती त्या शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाला झाकताना मोठी तारांबळ उडाली. अनेकांच्या पिकात पाणी साचल्याने आता सोयाबीन काढणीस अडथळा आला आहे. परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत.

शेंगांना कोंब फुटण्याची भीती

सोयाबीनच्या शेंगा वाळल्या आहेत. काहींना मजुराअभावी सोयाबीन पीक काढता आले नाही. त्यामुळे शेतातच असलेल्या या वाळलेल्या सोयाबीन शेगांना या पावसामुळे कोंब फुटू शकतात. तसे झाले तर काहीच पीक हातात येणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

ग्रामीण भागात ओढ्या-नाल्यांना पूर आला होता. शेतीच्या कामांना व्यत्यय आला. अनेकांचे सोयाबीन तळ्यात वाहुन गेले तर काही ठिकाणी तळे साचले आहे.

परिसरात शुक्रवारी अकरा ते तीनच्या सुमारास वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसास सुरुवात झाली.शेतात सोयाबीनची काढणी सुरू असल्याने मोठी तारांबळ उडाली. विजेचा लखलखाट व मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह पावसामुळे दरडवाडी येथे वीज पडून बैल मेला यामुळे भीतीदायक वातावरण झाले होते. शेतातील काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंज्यांमध्ये पाणी घुसले. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने एकच हाहाकार उडाला.

साकत परिसरात सोयाबीन काढून रब्बी हंगामाची पेरणी करायची आहे अनेक ठिकाणी कांदा व रब्बी हंगामातील ज्वारी पीक पाण्यात आहे. शेतात तळे साचले आहे.

कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर जामखेड न्युजशी बोलताना म्हणाले की, ज्या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला तेथे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here