जामखेड न्युज——
जिल्हा परिषद कोल्हेवाडी शाळेत लेखन साहित्य वाटून बालचिमुकल्याचा वाढदिवस साजरा

आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद शाळा कोल्हेवाडी येथे राजवीर लक्ष्मण कोल्हे या बालकाचा वाढदिवस सर्व शाळेतील लहान बालके,सवंगडी मित्र,व गावातील थोर मोठे या सर्वांमध्ये मिळून आगदी आनंदात साजरा करण्यात आला.

या निमित्य शाळेतील सर्व बालकांना अंकलिप (पुस्तक) वही व पेन अश्या लेखन साहित्य भेट देऊन करण्यात आले.या वेळी शालेय प्रांगणात छोटासा कार्यक्रम,खेळ घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत साकत चे सदस्य वाल्मिक दादा कोल्हे, राजेंद्र कोल्हे, उपसरपंच बळीराम कोल्हे आदी उपस्थित होते.त्याच बरोबर गावातील तरुण मित्र मंडळ राम कोल्हे,आस्तिक कोल्हे,मनोहर कोल्हे,राम कोल्हे,सोमा कोल्हे,सोमनाथ सरोदे, भास्कर कोल्हे,बाबुराव कोल्हे, आदींनी कार्याक्रमचे नियोजन केले.
त्याच बरोबर शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम अश्रू कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.त्याच बरोबर शाळेचे मुख्याध्यापक सर्व ग्रामस्थांना अश्या समाजउपयोगी कार्याक्रमचे पालकांनी,ग्रामस्थांनी आयोजन करावे असे अहवान केले.आणि आलेल्या सर्वांचे आभार मानले.