सभासदांच्या मनामनात रावसाहेब रोहोकले गुरुजी – राम निकम

0
183

 

जामखेड न्युज——

सभासदांच्या मनामनात रावसाहेब रोहोकले गुरुजी – राम निकम

उद्या दि.१६/१०/२०२२ रोजी होऊ घातलेल्या शिक्षक बॅंक व विकास मंडळ निवडणुकीसाठी रावसाहेब रोहोकले यांनी साडेतीन वर्षात बँकेची केलेली प्रगती,सभासदांसाठी सुरु केलेल्या विविध योजना, विकास मंडळाचे पुनर्निर्मिती साठी केलेले मनापासूनचे प्रयत्न, शिक्षकांच्या प्रश्नासाठी केलेले प्रयत्न, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत जि. प .कार्यालयाशी केलेला पाठपुरावा व अधिकारी व पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन सोडवले प्रश्न यामुळे रावसाहेब रोहोकले गुरुजी सर्व सभासदांच्या मनामनांत आहेत व त्यामुळे गुरुमाऊली मंडळ व त्यांचे चिन्ह असलेली मशाल 5500 पेक्षा जास्त मतांनी निवडून येणार असे ठाम मत शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष राम निकम यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले. 

उद्या लोकशाही पद्धतीने गुप्त मतदान प्रक्रिया ही पार पाडली जाणार आहेच.सर्व सभासद सदसद्विवेकबुद्धीने विचार करून चांगल्या ,योग्य व निर्णयक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान करणार आहेत.

सर्व मंडळांचा जाहिरनामा पाहता बऱ्याच बाबी दिशाभूल करणाऱ्या व फक्त निवडणूक समोर ठेवून केलेला आहे परंतु रोहोकले गुरुजींनी प्रत्यक्ष कृतीत उतरवता येईल असाच सभासद हिताचा जाहीरनामा दिलेला आहे. मागील साडेतीन वर्षात जाहिनाम्यापेक्षाही तालुक्यातील सभासदांनी भेटीत सांगितलेल्या बाबी आमलात आणल्या त्यामुळे मशाल चिन्ह असलेल्या गुरुजींच्या गुरूमाऊली मंडळाच्या वचननामा सर्वात प्रभावी,योग्य व १०० % अंमलात आणला जाईल अशी सभासदांना खात्री आहे.

सर्व उमेदवार अभ्यासू,तंत्रस्नेही ,सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करणारे ,व बॅंकींग क्षेत्राचा वास्तविक अभ्यास केलेले आहेत तसेच डी सी पी एस धारक, दिव्यांग देखील उमेदवार आहेत, प्रचारातही जास्त डामडौल न करता कमी खर्चात व सर्वांपर्यंत पोहोचता येईल असाच प्रयत्न आम्ही गुरुमाऊली शिलेदारांनी केलेला आहे. शिक्षक मित्र समुहाच्या लोकप्रियतेमुळे आश्वासक व विजयी वातावरण दृढ करण्यात यश आले.

इतर मंडळांसारख्या युत्या, आघाड्या न बनविता पुढील काळात बँकेत गट तट फोडाफोडीचे संभाव्य धोके टाळून स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहोत
प्रचारादरम्यानचा सभासदांचा कौल पाहता गुरुजींची गुरुमाऊलीची मशाल ही कमीतकमी दिड ते दोन हजारांच्या मताधिक्याने सहज निवडून येईल असा ठाम विश्वास आम्हाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here