पोस्टमन नागरिकांच्या भावना जपण्याच काम करतात-पत्रकार किरण रेडे 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर टपाल सप्ताह साजरा

0
187

जामखेड न्युज——

पोस्टमन नागरिकांच्या भावना जपण्याच काम करतात-पत्रकार किरण रेडे

9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर टपाल सप्ताह साजरा

जामखेड प्रतिनिधी

9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2022 टपाल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे यामध्ये 9 ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन,10 ऑक्टोबर राष्ट्रीय टपाल दिन,11 ऑक्टोबर तिकीट संग्रह दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे

जामखेड पोस्ट ऑफिसच्या वतीने नागेश विद्यालयात तिकीट संग्रह कार्यशाळा व टपाल तिकीट प्रदर्शन घेण्यात आले व जामखेड पोस्ट ऑफिस येथे उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख यांच्या उपस्थितीत
पत्रकार किरण रेडे यांच्या हस्ते जामखेड पोस्ट ऑफिस येथील सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला

आपण कितीही अत्याधुनिक युगात जरी आलो असलो तरी पोस्टाने येणाऱ्या पत्राची आपुलकी तुमच्या फोन कॉल ने पूर्ण होणार नाही ऊन,वारा,पाऊस यामध्ये चालत येणारे पोस्टमन किंवा सायकल वर येणारे पोस्टमन आपल्याला आठवतात
परंतु हल्ली आपल्याला पोस्टाने येणाऱ्या पत्राचा जवळजवळ विसर पडला आहे कारण आपण सर्व जण मोबाईल मध्ये गुंतलो आहोत परंतु खरंच होतो का हो पूर्वी येणाऱ्या पत्रा एव्हडा आनंद कारण आपण टीव्ही,मोबाईल यामध्ये सर्व काही आहे परंतु आपुलकी आणि आठवण मात्र नाही
म्हणूनच आज या अहोरात्र आपल्या पर्यंत संदेश,तार, मनिऑर्डर पुरवणाऱ्या पोस्टमन,पोस्टमास्तर यांचा सन्मान उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख व पत्रकार किरण रेडे यांच्या हस्ते पोस्टातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख,पत्रकार किरण रेडे,पोस्ट मास्टर बळी जायभाय, तांबे सर,महेश दांगट,अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे मा जिल्हाध्यक्ष गोरख राजगुरू,अविनाश ओतारी, जगदीश पेंलेवाढ,आनंद कात्रजकार, सुनील धस,संतोष औचरे,दादा धस,ईश्वर बोतत्रे,कालिदास कोल्हे,अखिलेश यादव,राजकुमार कुलकर्णी,हे उपस्थित होते

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोस्टमास्तर बळी जायभाय यांनी केले तर आभार अविनाश ओतारी यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here